Home /News /sport /

IND vs SA : 145 वर्षांच्या क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच, सगळ्या 20 खेळाडूंची सारखीच चूक, तुमच्या लक्षात आली का?

IND vs SA : 145 वर्षांच्या क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच, सगळ्या 20 खेळाडूंची सारखीच चूक, तुमच्या लक्षात आली का?

भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa 3rd Test) यांच्यात केपटाऊनमध्ये सुरू असलेल्या या टेस्टमध्ये विक्रमाची नोंद झाली आहे. 1877 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटची पहिली टेस्ट ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात खेळली गेली. पहिल्या टेस्टच्या 145 वर्षांनंतर अशाप्रकारचा विक्रम घडला आहे.

पुढे वाचा ...
    केपटाऊन, 13 जानेवारी : ऋषभ पंतच्या खणखणीत नाबाद शतकाच्या (Rishabh Pant Century) जोरावर भारताने तिसऱ्या टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेला (India vs South Africa 3rd Test) विजयासाठी 212 रनचं आव्हान दिलं. ऋषभ पंतची नाबाद 100 रनची खेळी वगळता कोणत्याही भारतीय खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. ऋषभ पंतनंतर विराट कोहलीच्या (Virat Kohli) 29 रन भारताचा सर्वाधिक स्कोअर होता. दुसऱ्या इनिंगमध्ये टीम इंडियाचा 198 रनवर ऑल आऊट झाला, म्हणजेच पंतने अर्ध्यापेक्षा जास्त रन केल्या. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात केपटाऊनमध्ये सुरू असलेल्या या टेस्टमध्ये विक्रमाची नोंद झाली आहे. 1877 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटची पहिली टेस्ट ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात खेळली गेली. पहिल्या टेस्टच्या 145 वर्षांनंतर अशाप्रकारचा विक्रम घडला आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडियाचा 223 रनवर ऑल आऊट झाला. यानंतर भारतीय बॉलर्सनी दक्षिण आफ्रिकेला 210 रनवर रोखलं, ज्यामुळे भारताला 13 रनची आघाडी मिळाली. या टेस्टच्या पहिल्या दोन्ही इनिंगमध्ये सगळे बॅटर कॅच आऊट झाले. 145 वर्षांच्या क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच पहिल्या दोन्ही इनिंगमध्ये 20 बॅटर कॅच आऊट होण्याची ही पहिलीच घटना आहे. याआधी पाच वेळा पहिल्या दोन इनिंगमध्ये 19 खेळाडू कॅच आऊट झाले होते. 1982/83 साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड ब्रिस्बेनमध्ये, 2009/10 साली ऑस्ट्रेलिया पाकिस्तानमध्ये सिडनीला, 2010/11 साली भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात डरबनमध्ये, 2013/14 साली ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यात ब्रिस्बेनमध्ये आणि 2019/20 साली दक्षिण आफ्रिका-इंग्लंड यांच्यात केपटाऊनमध्ये 19 खेळाडू कॅच आऊट झाले होते.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: South africa, Team india

    पुढील बातम्या