मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs SA : टीम इंडियावर T20 सीरिज गमावण्याचं संकट, कमबॅकसाठी सुधाराव्या लागणार या 4 चुका!

IND vs SA : टीम इंडियावर T20 सीरिज गमावण्याचं संकट, कमबॅकसाठी सुधाराव्या लागणार या 4 चुका!

Photo-BCCI

Photo-BCCI

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 5 टी-20 मॅचच्या (India vs South Africa T20) सीरिजची तिसरी मॅच मंगळवारी होणार आहे. टीम इंडियासाठी हा सामना करो या मरो चा आहे, कारण या सामन्यात पराभव झाला तर टीम इंडिया सीरिजही गमावेल.

मुंबई, 13 जून : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 5 टी-20 मॅचच्या (India vs South Africa T20) सीरिजची तिसरी मॅच मंगळवारी होणार आहे. टीम इंडियासाठी हा सामना करो या मरो चा आहे, कारण या सामन्यात पराभव झाला तर टीम इंडिया सीरिजही गमावेल. या सीरिजमध्ये टीम इंडिया लागोपाठ 12 टी-20 आंतरराष्ट्रीय विजय मिळवत उतरली होती, पण दक्षिण आफ्रिकेने पहिल्या दोन्ही टी-20 मध्ये भारताचा पराभव केला. पहिल्या सामन्यात बॉलर्स तर दुसऱ्या सामन्यात बॅटिंग टीमच्या पराभवाचं कारण ठरली. दोन्ही सामन्यांमध्ये ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) कॅप्टन्सीवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले.

पंतने दोन्ही मॅचमध्ये घेतलेल्या निर्णयाचा फटका टीम इंडियाला बसला. आता सीरिज वाचवण्यासाठी टीम इंडियाला चार चुका सुधाराव्या लागणार आहेत.

पॉवरप्लेमध्ये जलद रन करण्यात फेल

पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये टीम इंडियाच्या ओपनरला पॉवरप्लेमध्ये दमदार सुरूवात करून देता आली नाही. रोहित शर्मा आणि केएल राहुलच्या गैरहजेरीत इशान किशन (Ishan Kishan) आणि ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) यांनी इनिंगला सुरूवात केली, पण पॉवरप्लेमध्ये त्यांना आक्रमक बॅटिंग करण्यात अपयश आलं. इशानने दोन्ही सामन्यांमध्ये चांगली बॅटिंग केली. पहिल्या सामन्यात त्याने 48 बॉलमध्ये 158 च्या स्ट्राईक रेटने 76 रन ठोकले. तर दुसऱ्या टी-20 मध्ये तो 21 बॉलमध्ये 34 रन करून आऊट झाला.

ऋतुराज गायकवाड मात्र दोन्ही सामन्यांमध्ये मोठा स्कोअर करण्यात अपयशी ठरला. पहिल्या मॅचमध्ये 23 तर दुसऱ्या मॅचमध्ये त्याला फक्त 1 रन करता आली. पहिल्या टी-20 मध्ये ओपनरनी 6 ओव्हरमध्ये 51 रन केल्या, पण दुसऱ्या टी-20 मध्ये ऋतुराज पहिल्याच ओव्हरला आऊट झाला. तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाला ही चूक सुधारावी लागेल.

मधल्या ओव्हरमधली बॅटिंग

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या पहिल्या 2 टी-20 मध्ये विजय आणि पराभवाचं मुख्य कारण ठरलं ते दोन्ही टीमची बॅटिंग. पहिल्या टी-20 मध्ये पॉवरप्ले नंतर भारताने 14 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून 160 रन केले, म्हणजेच 11 रन प्रती ओव्हरने भारताने बॅटिंग केली, ज्यामुळे टीमचा स्कोअर 200 पेक्षा जास्त झाला. तर दक्षिण आफ्रिकेने पॉवरप्लेच्या 6 ओव्हरमध्ये 61 रन केले, म्हणजेच भारतापेक्षा 10 रन जास्त. यानंतर 14 ओव्हरमध्ये त्यांनी फक्त 1 विकेट गमावून 151 रन ठोकले.

दुसऱ्या टी-20 मॅचमध्येही असंच झालं. भारताने पॉवरप्लेनंतर 14 ओव्हरमध्ये 106 रन करत 5 विकेट गमावल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेची सुरूवात खराब झाली. पॉवरप्लेमध्ये त्यांनी 6 ओव्हर खेळून 29 रन केल्या आणि 3 विकेट गमावल्या. पण मधल्या ओव्हरमध्ये हेनरिक क्लासिनने उत्कृष्ट बॅटिंग केली, ज्यामुळे त्यांनी 12.2 ओव्हरमध्ये 10 रन प्रती ओव्हर करून 120 रन केल्या आणि विजय मिळवला.

भारताची फ्लॉप बॉलिंग

पहिल्या दोन्ही टी-20 सामन्यांमध्ये टीम इंडियाची बॉलिंग निराशाजनक होती. दुसऱ्या सामन्यात भुवनेश्वर कुमारने घेतलेल्या 4 विकेट वगळता कोणालाच छाप पाडता आली नाही. चहल आणि अक्षर पटेल या स्पिनरच्या जोडीने 5 ओव्हरमध्ये 68 रन दिले आणि 1 विकेट मिळवली. आवेश खान आणि हर्षल पटेलने 3-3 ओव्हरमध्ये 17-17 रन दिल्या, पण त्यांना विकेट घेण्यात यश आलं नाही. त्यामुळे तिसऱ्या टी-20 मध्ये टीमला ही चूक दुरुस्त करावी लागणार आहे. टीममध्ये सध्या उमरान मलिक, अर्शदीप सिंग हे फास्ट बॉलर आणि रवी बिष्णोईच्या रुपात लेग स्पिनर हा पर्याय आहे.

पंतच्या कॅप्टन्सीवर प्रश्नचिन्ह

केएल राहुलला दुखापत झाल्यामुळे ऋषभ पंतला या सीरिजमध्ये कॅप्टन्सीची संधी मिळाली, पण दोन्ही टी-20 सामन्यांमध्ये पंतने निराशा केली. त्याने घेतलेल्या निर्णयांवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले. दुसऱ्या टी-20 मध्ये अक्षर पटेलला दिनेश कार्तिकच्या आधी बॅटिंगला पाठवण्यात आलं. तर पहिल्या सामन्यात त्याने चहलला पूर्ण 4 ओव्हर दिल्या नाहीत. तिसऱ्या टी-20 मध्ये पंतने अशा चुका केल्या तर टीम इंडियावर सीरिज गमावण्याची नामुष्की ओढवू शकते.

First published:

Tags: South africa, Team india