विशाखापट्टणम, 14 जून : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये टीम इंडियाची (India vs South Africa T20 Series) कामगिरी निराशाजनक झाली आहे. पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये भारताचा पराभव झाला आहे, त्यामुळे सीरिज वाचवण्यासाठी टीमला मंगळवारी होणारी तिसरी मॅच (IND vs SA 3rd T20) जिंकणं गरजेचं आहे. या सामन्यात टीम इंडियात बदल होणार का? याबाबत चर्चा सुरू आहे. भारताचे माजी प्रशिक्षक संजय बांगर (Sanjay Bangar) यांच्या मते भारताने या सामन्यासाठी टीममध्ये दोन बदल केले पाहिजेत.
अक्षर पटेलऐवजी रवी बिष्णोई
अक्षर पटेलऐवजी (Axar Patel) लेग स्पिनर रवी बिष्णोई (Ravi Bishnoi) चांगला पर्याय ठरू शकतो, असं संजय बांगर म्हणाले. अक्षर पटेलला या सीरिजमध्ये चांगली कामगिरी करता आलेली नाही, त्याने दोन मॅचमध्ये फक्त एक विकेट घेतली आहे, तसंच रनही जास्त दिल्या.
आवेश खानऐवजी अर्शदीप
फास्ट बॉलर आवेश खानलाही (Avesh Khan) या सीरिजमध्ये प्रभाव पाडता आलेला नाही, त्यामुळे आवेशऐवजी अर्शदीप सिंगला (Arshdeep Singh) संधी मिळण्याची गरज आहे, असं वक्तव्य संजय बांगर यांनी केलं. अर्शदीप आयपीएल 2022 मध्ये पंजाब किंग्सकडून खेळला, तेव्हा त्याची कामगिरी शानदार झाली होती.
5 टी-20 मॅचच्या या सीरिजमधलं आव्हान कायम ठेवण्यासाठी भारतीय टीमला ही मॅच जिंकणं गरजेचं आहे. या सीरिजमध्ये ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) कॅप्टन्सीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे.
भारतीय टीम
ऋषभ पंत (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिष्णोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: South africa, Team india