विशाखापट्टणम, 13 जून : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातली तिसरी टी-20 मॅच (India vs South Africa 3rd T2o) मंगळवारी विशाखापट्टणममध्ये होणार आहे. हा सामना टीम इंडियासाठी करो या मरो चा आहे, कारण या मॅचमध्ये पराभव झाला तर टीम इंडियावर सीरिज गमावण्याची नामुष्की ओढावेल. 5 टी-20 मॅचच्या या सीरिजच्या पहिल्या दोन्ही मॅच भारताने गमावल्या आहेत, त्यामुळे दक्षिण आफ्रिका 2-0 ने आघाडीवर आहे. पहिल्या सामन्यात भारतीय बॅट्समननी चमकदार कामगिरी करत 210 पेक्षा जास्त रन केले, पण बॉलर्सनी निराशा केली. तर दुसऱ्या सामन्यात भारताची बॅटिंग अपयशी ठरली.
पहिल्या दोन सामन्यांमध्ये पराभव झाल्यानंतर टीम इंडिया तिसऱ्या सामन्यात काही बदल करते का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये ओपनर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) अपयशी ठरला, पण भारताकडे ओपनिंगला व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) वगळता दुसरा पर्याय नाही. आयपीएल 2022 मध्येही व्यंकटेश अय्यरची कामगिरी खराब झाली होती, त्यामुळे आत्मविश्वासाची कमी असलेल्या अय्यरला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.
आवेश खानला (Avesh Khan) दोन्ही सामन्यांमध्ये एकही विकेट घेता आलेली नाही, त्यामुळे त्याच्याऐवजी डावखुरा फास्ट बॉलर अर्शदीप सिंगला (Arshdeep Singh) संधी दिली जाऊ शकते, याशिवाय लेग स्पिनर युझवेंद्र चहलवरही (Yuzvendra Chahal) दोन्ही सामन्यांमध्ये आफ्रिकेच्या बॅट्समननी आक्रमण केलं, त्याच्याऐवजी रवी बिष्णोईचा (Ravi Bishnoi) पर्याय टीमकडे उपलब्ध आहे.
भारताची संभाव्य टीम
इशान किशन, ऋतुराज गायकवाड/व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, युझवेंद्र चहल/रवी बिष्णोई, आवेश खान/अर्शदीप सिंग
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: South africa, Team india