Home /News /sport /

IND vs SA : टीम इंडियाला आणखी एक धक्का! टेस्ट-वनडे सीरिज गमावल्यानंतर आता...

IND vs SA : टीम इंडियाला आणखी एक धक्का! टेस्ट-वनडे सीरिज गमावल्यानंतर आता...

टीम इंडियाने दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) दौऱ्यात निराशाजनक कामगिरी केली आहे. केपटाऊनमध्ये झालेल्या तिसऱ्या वनडेमध्ये दक्षिण आफ्रिकेचा विजय झाला. याचसोबत त्यांनी वनडे सीरिज 3-0 ने आपल्या नावावर केली.

    केपटाऊन, 24 जानेवारी : टीम इंडियाने दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) दौऱ्यात निराशाजनक कामगिरी केली आहे. केपटाऊनमध्ये झालेल्या तिसऱ्या वनडेमध्ये दक्षिण आफ्रिकेचा विजय झाला. याचसोबत त्यांनी वनडे सीरिज 3-0 ने आपल्या नावावर केली. याआधी टेस्ट सीरिजमध्येही टीम इंडियाचा 2-1 ने पराभव झाला होता. दक्षिण आफ्रिकेतल्या या खराब कामगिरीनंतर टीम इंडियाला आणखी एक धक्का बसला आहे. तिसऱ्या वनडेमध्ये स्लो ओव्हर रेटमुळे भारतीय टीमच्या मॅच फीची 40 टक्के रक्कम कापण्यात आली आहे. भारतीय टीमने मर्यादित वेळेमध्ये 2 ओव्हर कमी टाकल्या, त्यामुळे त्यांच्यावर दंडाची कारवाई करण्यात आली आहे. खेळाडूंसाठी आयसीसीने (ICC) बनवलेल्या कोड ऑफ कंडक्टच्या नियम 2.22 नुसार निर्धारित वेळेत टीमने ओव्हर पूर्ण केल्या नाहीत तर प्रत्येक खेळाडूला एका ओव्हरसाठी 20 टक्के दंड लावला जाईल. तिसऱ्या वनडेमध्ये भारताने 2 ओव्हर कमी टाकल्यामुळे टीमला 40 टक्के दंड लावण्यात आला. टीम इंडियाचा कर्णधार केएल राहुलने आपली चूक मान्य केली, त्यामुळे या प्रकरणाची अधिकृत सुनावणी घेण्यात आली नाही. केपटाऊनमध्ये झालेल्या तिसऱ्या वनडेमध्ये दक्षिण आफ्रिकेने पहिले बॅटिंग करत 49.5 ओव्हरमध्ये 287 रन केले. क्विंटन डिकॉकने 124 रनची खेळी केली, तर रस्सी व्हॅन डर डुसेनने 52 रन केले. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा 49.2 ओव्हरमध्ये 283 रनवर ऑल आऊट झाला. भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक 65 रन केले, याशिवाय शिखर धवननेही अर्धशतक केलं. दक्षिण आफ्रिकेच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने 210 रनवरच 6 विकेट गमावल्या. यानंतर दीपक चहरने धमाकेदार बॅटिंग करत भारताला आव्हानाच्या जवळ पोहोचवलं. चहरने बुमराहसोबत 8 व्या विकेटसाठी 55 रनची पार्टनरशीप केली. 48 व्या ओव्हरमध्ये लुंगी एनगिडीच्या बॉलिंगवर मोठा शॉट खेळण्याच्या नादात तो आऊट झाला. यावेळी भारताचा स्कोअर 278/8 असा होता. टीम इंडियाला अखेरच्या 12 बॉलमध्ये विजयासाठी 8 रनची गरज होती, पण बुमराह 12 रनवर आऊट झाला. यानंतर युझवेंद्र चहल आणि प्रसिद्ध कृष्णा यांना भारताला जिंकवता आलं नाही. 4 बॉल शिल्लक असताना भारताचा 283 रनवर ऑल आऊट झाला आणि दक्षिण आफ्रिकेला 4 रनने विजय मिळाला. याचसोबत भारताने वनडे सीरिज 3-0 ने गमावली.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Icc, Kl rahul, South africa, Team india

    पुढील बातम्या