Home /News /sport /

IND vs SA : 'जोहान्सबर्ग टेस्ट जिंकून सगळ्यात महान क्रिकेटपटूला बर्थडे गिफ्ट द्या', गावसकरांचं टीम इंडियाला आवाहन

IND vs SA : 'जोहान्सबर्ग टेस्ट जिंकून सगळ्यात महान क्रिकेटपटूला बर्थडे गिफ्ट द्या', गावसकरांचं टीम इंडियाला आवाहन

Sunil Gavaskar

Sunil Gavaskar

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातली दुसरी टेस्ट (India vs South Africa 2nd Test) रोमांचक अवस्थेमध्ये पोहोचली आहे. सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनी जोहान्सबर्ग टेस्ट जिंकून भारताच्या सगळ्यात महान क्रिकेटपटूला बर्थडे गिफ्ट द्या, असं आवाहन केलं आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 6 जानेवारी : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातली दुसरी टेस्ट (India vs South Africa 2nd Test) रोमांचक अवस्थेमध्ये पोहोचली आहे. दक्षिण आफ्रिकेला सीरिजमध्ये 1-1 ने बरोबरी करण्यासाठी आणखी 122 रनची गरज आहे. चौथ्या दिवशी पाऊस पडल्यामुळे पहिल्या दोन सत्रांचा खेळ होऊ शकला नाही, अखेर चहानंतर खेळाला सुरूवात झाली. याआधी सेंच्युरियनमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवला होता. आता जोहान्सबर्गची ही टेस्ट जिंकून सीरिज खिशात टाकण्याची संधी भारतीय टीमला आहे. आतापर्यंत भारताला एकदाही दक्षिण आफ्रिकेत टेस्ट सीरिज जिंकता आलेली नाही. भारत-दक्षिण आफ्रिका सीरिजमध्ये कॉमेंट्री करणाऱ्या सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनी जोहान्सबर्ग टेस्ट जिंकून भारताच्या सगळ्यात महान क्रिकेटपटूला बर्थडे गिफ्ट द्या, असं आवाहन भारतीय टीमला केलं आहे. 'भारताला दक्षिण आफ्रिकेत कधीच टेस्ट सीरिज जिंकता आलेली नाही. 2018 साली त्यांनी इकडे वनडे सीरिज जिंकली होती, पण टेस्ट सीरिज 2-1 ने गमावली होती. ही सीरिज जिंकली तर भारतीय क्रिकेटसाठी हे खूप मोठं असेल,' असं गावसकर म्हणाले. 'कपिल देव (Kapil Dev) यांचा गुरूवारी वाढदिवस आहे, त्यामुळे भारताने जर हा सामना जिंकला तर, देशाच्या सगळ्यात महान क्रिकेटपटूसाठी यापेक्षा मोठं बर्थडे गिफ्ट कोणतंच असणार नाही,' असं वक्तव्य गावसकर यांनी केलं. भारताला 1983 साली सगळ्यात पहिला वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या कपिल देव यांचा वाढदिवस 6 जानेवारीला असतो. कपिल देव आज 63 वर्षांचे झाले आहेत. 2000 साली विस्डनने कपिल देव सचिन तेंडुलकर आणि सुनिल गावसकर यांना मागे टाकत भारताचे सगळ्यात महान खेळाडू म्हणून घोषित केलं. 1983 सालच्या भारताच्या ऐतिहासिक वर्ल्ड कप विजयावरचा 83 हा चित्रपटही नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटात रणवीर सिंगने कपिल देव यांची भूमिका साकारली आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: South africa, Sunil gavaskar, Team india

    पुढील बातम्या