Home /News /sport /

IND vs SA : जोहान्सबर्ग टेस्टमधून शार्दुल-अश्विन आऊट! या दोघांना मिळणार संधी

IND vs SA : जोहान्सबर्ग टेस्टमधून शार्दुल-अश्विन आऊट! या दोघांना मिळणार संधी

सेंच्युरियनमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा (India vs South Africa) पराभव केला, याचसह भारताने 3 टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली. आता जोहान्सबर्ग टेस्टमध्ये विजय मिळवून 29 वर्षांचा दुष्काळ संपवण्याची संधी टीम इंडियाला आहे.

पुढे वाचा ...
    जोहान्सबर्ग, 1 जानेवारी : सेंच्युरियनमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा (India vs South Africa) पराभव केला, याचसह भारताने 3 टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली. आता जोहान्सबर्ग टेस्टमध्ये विजय मिळवून 29 वर्षांचा दुष्काळ संपवण्याची संधी टीम इंडियाला आहे. कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) यांची नजर यावरच असेल. पण जोहान्सबर्गची खेळपट्टी पाहता टीममध्ये दोन बदल होऊ शकतात. शार्दुल ठाकूरऐवजी (Shardul Thakur) फास्ट बॉलर उमेश यादवचं (Umesh Yadav) टीममध्ये पुनरागमन होऊ शकतं, तर अश्विनऐवजी (R Ashwin) अतिरिक्त बॅटर मैदानात उतरण्याची शक्यता आहे. टीमने असा निर्णय घेतला तर हनुमा विहारीला (Hanuma Vihari) संधी मिळू शकते. विराट कोहली परदेशात जेव्हा टेस्ट खेळतो तेव्हा प्लेयिंग इलेव्हनमध्ये पाचवा बॉलर म्हणून ऑलराऊंडरला खेळवणं पसंत करतो, त्यामुळे पहिल्या टेस्टमध्ये शार्दुलला संधी मिळाली. जोहान्सबर्गच्या खेळपट्टीवर मात्र गवत दिसत आहे, याचा फायदा घेण्यासाठी विराट टीममध्ये बदल करू शकतो. शार्दुलऐवजी उमेश? जोहान्सबर्गमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाऊस झाला आहे, तसंच खेळपट्टीवर गवतही आहे. हवेतला ओलावा सीम बॉलरना मदत करेल, त्यामुळे उमेश यादवची स्विंग बॉलिंग भारतासाठी फायद्याची ठरू शकते. शार्दुल ठाकूरला सेंच्युरियन टेस्टमध्ये बॉल आणि बॅटने प्रभाव पाडता आला नाही. त्याने 14 रन करण्यासोबतच 16 ओव्हरमध्ये बॉलिंग करून फक्त 2 विकेट घेतल्या. उमेश यादव 140 किमी प्रती तासच्या वेगाने बॉलिंग करतो. जोहान्सबर्गची खेळपट्टी उमेशसाठी उपयुक्त ठरेल, त्यामुळे त्याचा चौथा बॉलर म्हणून विचार होऊ शकतो. जोहान्सबर्ग टेस्टमध्ये भारत स्पिनर मैदानात उतरवणार का? हादेखील महत्त्वाचा प्रश्न आहे. सेंच्युरियन टेस्टमध्ये टीमने अश्विनला संधी दिली होती. खेळपट्टीमध्येही स्पिन बॉलरसाठीही काहीच नव्हतं. या टेस्टच्या अखेरच्या इनिंगमध्ये अश्विनने शेवटच्या 2 विकेट घेतल्या. पहिल्या इनिंगमध्ये मात्र 13 ओव्हर बॉलिंग करून अश्विनला एकही विकेट मिळाली नाही. जोहान्सबर्गची खेळपट्टीही सेंच्युरियनसारखीच असणार आहे. 2018 साली भारत जोहान्सबर्ग टेस्टमध्ये 4 फास्ट बॉलर घेऊन खेळला होता. पाचव्या बॉलरची भूमिका हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) पार पाडली होती. त्या टेस्टमध्ये भारताचा 63 रनने विजय झाला होता. तर 2013 साली अश्विन जोहान्सबर्ग टेस्ट खेळला होता, त्यावेळी त्याने 42 ओव्हर बॉलिंग केली, तरीही त्याला एकही विकेट मिळाली नाही. यावेळीही जोहान्सबर्गच्या खेळपट्टीवर गवत आहे, तसंच पावसाचाही अंदाज आहे, त्यामुळे अश्विनच्या खेळण्याची शक्यता कमी आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Shardul Thakur, South africa, Team india

    पुढील बातम्या