Home /News /sport /

IND vs SA : इतिहास घडणार! इंग्लंड-ऑस्ट्रेलियानंतर आफ्रिकेचा गडही जिंकणार 'विराट'सेना!

IND vs SA : इतिहास घडणार! इंग्लंड-ऑस्ट्रेलियानंतर आफ्रिकेचा गडही जिंकणार 'विराट'सेना!

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या टेस्टला (India vs South Africa 2nd Test) सोमवारपासून जोहान्सबर्गमध्ये सुरुवात होत आहे. सेंच्युरियनमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा 113 रननी दणदणीत विजय झाला होता, यानंतर आता दुसरी टेस्ट खिशात टाकून दक्षिण आफ्रिकेत ऐतिहासिक सीरिज विजय मिळवण्याची संधी विराटच्या (Virat Kohli) टीमकडे आहे.

पुढे वाचा ...
    जोहान्सबर्ग : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या टेस्टला (India vs South Africa 2nd Test) सोमवारपासून जोहान्सबर्गमध्ये सुरुवात होत आहे. सेंच्युरियनमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा 113 रननी दणदणीत विजय झाला होता, यानंतर आता दुसरी टेस्ट खिशात टाकून दक्षिण आफ्रिकेत ऐतिहासिक सीरिज विजय मिळवण्याची संधी विराटच्या (Virat Kohli) टीमकडे आहे. आतापर्यंत भारताला (Team India) एकदाही दक्षिण आफ्रिकेत टेस्ट सीरिज जिंकता आलेली नाही, त्यामुळे हा दुष्काळ मिटवण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. भारतासाठी दिलासादायक गोष्ट म्हणजे टीमने जोहान्सबर्गमध्ये एकही टेस्ट मॅच गमावली नाही. वॉन्डरर्सच्या या मैदानात टीम इंडियाने 5 टेस्ट खेळल्या, यातल्या दोन मॅच भारताने जिंकल्या, यक तीन मॅच ड्रॉ झाल्या. 2018 साली झालेल्या मागच्या दौऱ्यात भारताने जोहान्सबर्गमध्ये विजय मिळवला होता. विराटची टीम इतिहास घडवणार याआधी भारताने ऑस्ट्रेलियाचा ऑस्ट्रेलियात 2-1 ने पराभव केला, तर इंग्लंडविरुद्ध इंग्लंडमध्ये 2-1 ने आघाडी घेतली. आता दक्षिण आफ्रिकेमध्येही टेस्ट सीरिज जिंकून विक्रम करण्याची संधी विराटच्या नेतृत्वात खेळणाऱ्या टीम इंडियाला आहे. आतापर्यंत भारताच्या कोणत्याच कर्णधाराला अशी कामगिरी करता आलेली नाही. किती वाजता सुरू होणार मॅच? भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातली दुसरी टेस्ट भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होईल, तर टॉस एक वाजता पडेल. कुठे होणार सामना? भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातली दुसरी टेस्ट जोहान्सबर्गच्या वॉन्डरर्स स्टेडियममध्ये होणार आहे. कुठे होणा LIVE प्रसारण? भारत-दक्षिण आफ्रिकेतल्या दुसऱ्या टेस्टचं लाईव्ह प्रसारण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर होणार आहे. LIVE Streaming कुठे बघता येणार? भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या मॅचचं लाईव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टारवरही बघता येणार आहे. भारतीय टीम विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल (उप कर्णधार), मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, अजिंक्य रहाणे, ऋद्धीमान साहा (विकेटकीपर), जयंत यादव, प्रियांक पांचाळ, उमेश यादव, हनुमा विहारी, इशांत शर्मा दक्षिण आफ्रिकेची टीम डीन एल्गर (कर्णधार), टेम्बा बवुमा (उपकर्णधार), रेयान रिकलटन (विकेटकीपर), कागिसो रबाडा, सरेल एरवी, ब्यूरन हेंड्रिक्स, जॉर्ज लिंडे, केशव महाराज, लुंगी एनगिडी, एडन मार्करम, वियान मुल्डर, कीगन पीटरसन, रासी व्हॅन डर डूसेन, काइल वेरेने, मार्को जेन्सन, ग्लेनटन स्टुरमॅन, प्रेनेलन सुब्रायन, सिसांडा मगला, डुआन ओलीवर
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: South africa, Team india

    पुढील बातम्या