Home /News /sport /

IND vs SA 2nd Test : मिडल ऑर्डरचं पुन्हा लोटांगण, जोहान्सबर्गमध्ये टीम इंडिया अडचणीत

IND vs SA 2nd Test : मिडल ऑर्डरचं पुन्हा लोटांगण, जोहान्सबर्गमध्ये टीम इंडिया अडचणीत

भारताविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवसाअखेरीस दक्षिण आफ्रिकेचा (India vs South Africa 2nd Test) स्कोअर 35/1 एवढा झाला आहे, त्यामुळे ते अजूनही 167 रननी पिछाडीवर आहेत.

    जोहान्सबर्ग, 3 जानेवारी : भारताविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवसाअखेरीस दक्षिण आफ्रिकेचा (India vs South Africa 2nd Test) स्कोअर 35/1 एवढा झाला आहे, त्यामुळे ते अजूनही 167 रननी पिछाडीवर आहेत. दिवसाचा खेळ संपला तेव्हा कीगन पीटरसन 14 रनवर, तर डीन एल्गार 11 रनवर नाबाद खेळत आहेत. मोहम्मद शमीने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गारची विकेट घेतली. त्याआधी टीम इंडियाचा फक्त 202 रनवर ऑल आऊट झाला. विराट कोहलीच्या (Virat Kohli) अनुपस्थितीमध्ये कॅप्टन्सी करणाऱ्या केएल राहुलने (KL Rahul) या सामन्यात टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. यानंतर राहुल आणि मयंकच्या जोडीने भारताला सावध सुरूवात करून दिली, पण 36 रनवर मयंकच्या रूपात टीम इंडियाला पहिला धक्का लागला. मयंक अग्रवालची विकेट गेल्यानंतर मात्र भारताची पडझड सुरू झाली. चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) 3 रनवर आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) पहिल्याच बॉलला शून्य रनवर आऊट झाला. सुरूवातीच्या तीन विकेट लगेच गेल्यानंतर राहुलने हनुमा विहारीच्या साथीने डाव सावरायला सुरूवात केली, पण विहारी 20 रनवर आऊट झाला. यानंतर केएल राहुल त्याचं अर्धशतक करून माघारी परतला. ऋषभ पंतने 17 रन केले, पण आर.अश्विनने भारताचा स्कोअर 200 च्या पार न्यायला मदत केली. अश्विनने 50 बॉलमध्ये 46 रनची खेळी करून टीम इंडियाची नामुष्की वाचवली. दक्षिण आफ्रिकेकडून मार्को जेनसनने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, तर कागिसो रबाडा आणि डुआन ओलिव्हरला प्रत्येकी 3-3 विकेट मिळाल्या. भारत आणि दक्षिण आफ्रिकेतला सामना सुरू व्हायच्या आधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला, कारण पाठीच्या दुखापतीमुळे विराट कोहली या सामन्यात खेळू शकणार नाही. सेंच्युरियन टेस्टमध्ये विजय मिळवल्यामुळे 3 टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये टीम इंडिया 1-0 ने आघाडीवर आहे. आतापर्यंत भारताला दक्षिण आफ्रिकेत सीरिज जिंकता आलेली नाही, त्यामुळे इतिहास घडवण्याची संधी टीमपुढे आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: South africa, Team india

    पुढील बातम्या