मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs SA : 'द्रविडनेही त्याला बांबू दिला असेल', भारतीय खेळाडूवर संतापले गावसकर

IND vs SA : 'द्रविडनेही त्याला बांबू दिला असेल', भारतीय खेळाडूवर संतापले गावसकर

भारताचे महान क्रिकेटपटू सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) हे कायमच त्यांच्या स्पष्टवक्तेपणाबद्दल ओळखले जातात. यावेळी गावसकरांच्या निशाण्यावर आलाय भारताचा विकेट कीपर ऋषभ पंत (Rishabh Pant). जोहान्सबर्ग टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये (India vs South Africa 2nd Test) पंतने खेळलेल्या शॉटमुळे गावसकर चांगलेच नाराज झाले.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

जोहान्सबर्ग, 6 जानेवारी : भारताचे महान क्रिकेटपटू सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) हे कायमच त्यांच्या स्पष्टवक्तेपणाबद्दल ओळखले जातात. खेळाडू कितीही छोटा किंवा मोठा असो, गावसकर त्याच्यावर टीका करायला मागे पुढे पाहत नाहीत. यावेळी गावसकरांच्या निशाण्यावर आलाय भारताचा विकेट कीपर ऋषभ पंत (Rishabh Pant). जोहान्सबर्ग टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये (India vs South Africa 2nd Test) पंतने खेळलेल्या शॉटमुळे गावसकर चांगलेच नाराज झाले. लाईव्ह कॉमेंट्री करतानाही त्यांनी ही नाराजी व्यक्त केली, त्यानंतर आता पुन्हा एकदा ते पंतच्या या शॉटबद्दल बोलले आहेत.

जोहान्सबर्ग टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये पंत तीन बॉल खेळल्यानंतर शून्य रनवर आऊट झाला. या मॅचच्या पहिल्या इनिंगमध्येही त्याने फक्त 17 रन केले होते. रहाणे आणि पुजाराने झुंजार अर्धशतकं केल्यानंतर पंतला जबाबदारीने खेळण्याची गरज होती, पण तो आऊट झाला. ज्यामुळे भारताचा स्कोअर 167/5 एवढा झाला.

स्टार स्पोर्ट्ससोबत चर्चेमध्ये गावसकर म्हणाले, 'पंतने 30-40 रन केल्यानंतर हा शॉट मारला असता, तर मी समजू शकलो असतो. त्याने असं काही ऑस्ट्रेलियात केलं नव्हतं. तिकडे त्याने संयम दाखवला होता. तुम्ही सुरुवातीला बॅटिंगला येता तेव्हा गोष्टी कठीण असतात हे मान्य आहे. सेट झाल्यानंतर मोठे शॉट खेळले पाहिजेत, ऑस्ट्रेलियात त्याने हेच केलं.'

'इंग्लंडची टीम जेव्हा भारतात आली तेव्हा पंतने अंडरसनच्या बॉलिंगवर चांगले शॉट मारण्याचे प्रयत्न केले, पण त्यानंतर... त्याला वाटतं खेळण्याची ही एकमेव पद्धत आहे. पण ही खेळण्याची पद्धत नाही. राहुल द्रविडने त्याला ड्रेसिंग रूममध्ये नक्कीच सुनावलं असेल. क्रिकेटच्या भाषेत बोलतात तसं द्रविडने त्याला बांबूने मारलं असेल,' असं वक्तव्य गावसकरांनी केलं.

दरम्यान टेस्ट मॅचच्या तिसऱ्या दिवशीही गावसकरांनी लाईव्ह कॉमेंट्रीवेळी पंतला सुनावलं होतं. 'ऋषभ पंतने बेजबाबदार शॉट मारला, तो अजिबात लढला नाही. या शॉटसाठी कोणतीही कारणं नकोत. हा त्याचा नैसर्गिक खेळ आहे, हे तर मूर्खपणाचं कारण आहे. पुजारा आणि रहाणे जखमा घेत असताना, पंतने जबाबदारी दाखवायला पाहिजे होती, कारण टीम अडचणीत होती. आता तर अनुभवाची कमी नाही,' अशी संतप्त प्रतिक्रिया गावसकरांनी दिली.

ऋषभ पंतचा खराब फॉर्म

ऋषभ पंतने त्याचं मागचं शतक 2021 साली इंग्लंडविरुद्ध केलं होतं. अहमदाबाद टेस्टमध्ये पंतने 101 रनची खेळी केली होती. या शतकानंतर पंतने 13 इनिंग खेळल्या, यात त्याने एका अर्धशतकाच्या मदतीने 250 रन केले. या दरम्यान त्याची सरासरीही फक्त 19.23 ची आहे.

ऋषभ पंतने 13 इनिंग्समध्ये 4, 41, 25, 37, 22, 2, 1, 9, 50, 8, 34, 17, 0 असे स्कोअर केले आहेत. पंतसाठी 2021 सालची सुरूवात चांगली झाली होती. ऑस्ट्रेलियात सीरिज जिंकवण्यामध्ये पंतची भूमिका मोलाची होती. सिडनी टेस्टच्या अखेरच्या इनिंगमध्ये त्याने 97 रन करून मॅच ड्रॉ केली होती, तर ब्रिस्बेनमध्ये नाबाद 89 रन करून पंतने भारताला विजय मिळवून दिला होता. यानंतर इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानात झालेल्या सीरिजमध्येही पंतने त्याचा फॉर्म कायम ठेवला, पण त्यानंतर पंतचा संघर्ष सुरू झाला.

First published:

Tags: Rahul dravid, Rishabh pant, South africa, Sunil gavaskar, Team india