Home /News /sport /

IND vs SA : 'विराट असं करणारच नाही', 'कॅप्टन कोहली'ने माघार घेतल्यानंतर असं का म्हणाले गावसकर?

IND vs SA : 'विराट असं करणारच नाही', 'कॅप्टन कोहली'ने माघार घेतल्यानंतर असं का म्हणाले गावसकर?

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या टेस्टला (India vs South Africa 2nd Test) जोहान्सबर्गमध्ये सुरूवात झाली आहे. पण या टेस्टआधीच टीम इंडियाला मोठा धक्का लागला. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) या मॅचमध्ये खेळणार नाही

पुढे वाचा ...
    जोहान्सबर्ग, 3 जानेवारी : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या टेस्टला (India vs South Africa 2nd Test) जोहान्सबर्गमध्ये सुरूवात झाली आहे. सेंच्युरियनमधली पहिली टेस्ट जिंकल्यानंतर या टेस्टमध्येही विजय मिळवत इतिहास घडवण्याची टीम इंडियाला संधी आहे. आतापर्यंत भारताला एकदाही दक्षिण आफ्रिकेत टेस्ट सीरिज जिंकता आलेली नाही. पण जोहान्सबर्ग टेस्टआधीच टीम इंडियाला मोठा धक्का लागला. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) या मॅचमध्ये खेळणार नाही, त्याच्याऐवजी केएल राहुलला टीमचं नेतृत्व देण्यात आलं आहे. केएल राहुल (KL Rahul) जेव्हा टॉससाठी मैदानात आला तेव्हा त्याने विराटची पाठ दुखत असल्यामुळे तो हा सामना खेळत नसल्याचं सांगितलं. असं असलं तरी विराटच्या अनुपस्थितीवर शंका उपस्थित करण्यात आल्या. खरं तर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात केप टाऊनमध्ये होणारी तिसरी टेस्ट विराटची 100 वी टेस्ट असणार होती, पण या मॅचमधून विराटने माघार घेतल्यामुळे विराट आता पुढची टेस्ट खेळला तरी ती त्याची 99 वी टेस्ट असेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची सीरिज संपल्यानंतर भारत फेब्रुवारी महिन्यात श्रीलंकेविरुद्ध (India vs Sri Lanka) टेस्ट सीरिज खेळणार आहे. या सीरिजची पहिली टेस्ट बँगलोरमध्ये होणार आहे आणि हीच विराटची 100 वी टेस्ट असेल. विराटला बँगलोरमध्ये 100 वी टेस्ट खेळायची असल्यामुळे त्याने या टेस्टमधून माघार घेतली असल्याच्या उलट सुलट चर्चाही सुरू झाल्या. भारताचे माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनी मात्र या चर्चांमध्ये काहीच अर्थ नसल्याची प्रतिक्रिया दिली. विराट कोहली असं करणार नाही, असं गावसकर कॉमेंट्री करताना म्हणाले. विराटचं बँगलोर प्रेम विराट कोहलीचे बँगलोर प्रेम हे सर्वश्रूत आहे. आयपीएलच्या पहिल्या मोसमापासूनच विराट आरसीबीकडून (RCB) खेळतो आहे. तसंच त्याने आपण आयपीएलची अखेरची मॅचही आरसीबीकडूनच खेळणार असल्याचं विराटने आधीच स्पष्ट केलं आहे. आयपीएल 2021 (IPL 2021) सुरू व्हायच्या आधीच विराटने आपण या मोसमानंतर आरसीबीची कॅप्टन्सी सोडत असल्याचं घोषित केलं. आयपीएल 2021 चा दुसरा राऊंड युएईमध्ये झाल्यामुळे त्याला कॅप्टन्सीचा शेवट बँगलोरमध्ये करता आला नाही. आता आपली 100 वी ऐतिहासिक टेस्ट बँगोलरमध्ये खेळण्यासाठी विराटने जोहान्सबर्ग टेस्टमधून माघार घेतल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं आहे. एवढच नाही तर काहींनी 100 वी टेस्ट बँगलोरमध्ये खेळून विराट आता टेस्ट टीमची कॅप्टन्सीही बँगलोरमध्ये सोडेल, अशाही प्रतिक्रिया सोशल मीडियावर दिल्या आहेत. टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडल्यानंतर विराटला वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हटवण्यात आलं होतं, यावरूनही भारतीय क्रिकेटमध्ये मोठा वाद झाला होता. विराटला टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडू नकोस असं सांगण्यात आलं होतं, पण तो ऐकला नाही. निवड समितीला मर्यादित ओव्हरच्या क्रिकेटसाठी एकच कर्णधार हवा होता, त्यामुळे विराटला वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हटवण्यात आल्याचं बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) सांगितलं. विराटने मात्र गांगुलीचा दावा फेटाळून लावला. आपल्याला टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडू नकोस, असं कधीही सांगण्यात आलं नसल्याचं विराट म्हणाला.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: South africa, Sunil gavaskar, Team india, Virat kohli

    पुढील बातम्या