Home /News /sport /

IND vs SA : Live Commentary मध्येच भडकले गावसकर, ऋषभ पंतने असं काय केलं?

IND vs SA : Live Commentary मध्येच भडकले गावसकर, ऋषभ पंतने असं काय केलं?

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी (India vs South Africa 2nd Test) चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांनी अर्धशतक केलं.

    जोहान्सबर्ग, 5 जानेवारी : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी (India vs South Africa 2nd Test) चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांनी अर्धशतक केलं. या खेळीमुळे दोघांची टीम इंडियाच्या बाहेर जायची टांगती तलवार निदान तिसऱ्या टेस्टसाठी तरी टळली आहे. कारण गेल्या काही काळापासून या दोघांची कामगिरी निराशाजनक होत आहे, तसंच त्यांना टीममधून बाहेर काढण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. एकीकडे पुजारा आणि रहाणेच्या खराब कामगिरीवर टीका होत असली, तरी टीमचा आणखी एक खेळाडू मैदानात संघर्ष करत आहे. जोहान्सबर्ग टेस्टच्या दोन्ही इनिंगमध्येही त्याचा संघर्ष असाच कायम राहिला. जोहान्सबर्ग टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये रहाणे 58 रनवर तर पुजारा 53 रनवर आऊट झाले, यानंतर ऋषभ पंत (Rishabh Pant) बॅटिंगला आला, पण तो 3 बॉलमध्ये शून्य रनवर आऊट झाला. ऋषभ पंतने मारलेला खराब शॉट पाहून लाईव्ह कॉमेंट्री करणारे सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) चांगलेच भडकले. 'ऋषभ पंतने बेजबाबदार शॉट मारला, तो अजिबात लढला नाही. या शॉटसाठी कोणतीही कारणं नकोत. हा त्याचा नैसर्गिक खेळ आहे, हे तर मूर्खपणाचं कारण आहे. पुजारा आणि रहाणे जखमा घेत असताना, पंतने जबाबदारी दाखवायला पाहिजे होती, कारण टीम अडचणीत होती. आता तर अनुभवाची कमी नाही,' अशी संतप्त प्रतिक्रिया गावसकरांनी दिली. ऋषभ पंतचा खराब फॉर्म ऋषभ पंतने त्याचं मागचं शतक 2021 साली इंग्लंडविरुद्ध केलं होतं. अहमदाबाद टेस्टमध्ये पंतने 101 रनची खेळी केली होती. या शतकानंतर पंतने 13 इनिंग खेळल्या, यात त्याने एका अर्धशतकाच्या मदतीने 250 रन केले. या दरम्यान त्याची सरासरीही फक्त 19.23 ची आहे. ऋषभ पंतने 13 इनिंग्समध्ये 4, 41, 25, 37, 22, 2, 1, 9, 50, 8, 34, 17, 0 असे स्कोअर केले आहेत. पंतसाठी 2021 सालची सुरूवात चांगली झाली होती. ऑस्ट्रेलियात सीरिज जिंकवण्यामध्ये पंतची भूमिका मोलाची होती. सिडनी टेस्टच्या अखेरच्या इनिंगमध्ये त्याने 97 रन करून मॅच ड्रॉ केली होती, तर ब्रिस्बेनमध्ये नाबाद 89 रन करून पंतने भारताला विजय मिळवून दिला होता. यानंतर इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानात झालेल्या सीरिजमध्येही पंतने त्याचा फॉर्म कायम ठेवला, पण त्यानंतर पंतचा संघर्ष सुरू झाला.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Rishabh pant, South africa, Sunil gavaskar, Team india

    पुढील बातम्या