Home /News /sport /

IND vs SA : ...तर विराटऐवजी श्रेयस अय्यरला मिळाली असती संधी, एक चूक पडली महागात

IND vs SA : ...तर विराटऐवजी श्रेयस अय्यरला मिळाली असती संधी, एक चूक पडली महागात

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात जोहान्सबर्गमध्ये दुसऱ्या टेस्टला (India vs South Africa) सुरुवात झाली आहे, पण या टेस्ट मॅचआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. पाठीच्या दुखापतीमुळे कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) या मॅचमधून बाहेर झाला आहे.

पुढे वाचा ...
    जोहान्सबर्ग, 3 जानेवारी : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात जोहान्सबर्गमध्ये दुसऱ्या टेस्टला (India vs South Africa) सुरुवात झाली आहे, पण या टेस्ट मॅचआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. पाठीच्या दुखापतीमुळे कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) या मॅचमधून बाहेर झाला आहे. विराटऐवजी केएल राहुलला (KL Rahul) टीमचं नेतृत्व देण्यात आलं आहे. तसंच जसप्रीत बुमराह (Jaspirt Bumrah) टीमचा उपकर्णधार आहे. विराट कोहलीऐवजी हनुमा विहारीला (Hanuma Vihari) टीममध्ये संधी मिळाली आहे. टीम इंडियाने श्रेयस अय्यरपेक्षा (Shreyas Iyer) हनुमा विहारीवर विश्वास दाखवल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. कारण काहीच दिवसांपूर्वी श्रेयस अय्यरने न्यूझीलंडविरुद्धच्या त्याच्या पदार्पणाच्या टेस्टमध्येच (India vs New Zealand) शतक आणि अर्धशतक केलं होतं. असा विक्रम करणारा तो भारताचा पहिलाच क्रिकेटपटू ठरला होता. या शानदार सुरुवातीनंतरी श्रेयस अय्यरला जोहान्सबर्ग टेस्टमध्ये संधी का मिळाली नाही, याचं कारण समोर आलं आहे. श्रेयस अय्यरचं पोट खराब असल्यामुळे तो निवडीसाठी उपलब्ध नव्हता, असं बीसीसीआयने सांगितलं आहे. बीसीसीआयने (BCCI) दिलेल्या माहितीनुसार विराट कोहलीने आज सकाळी पाठीच्या वरच्या भागात दुखत असल्याचं सांगितलं, त्यामुळे तो जोहान्सबर्ग टेस्टमध्ये खेळणार नाही. बीसीसीआयची मेडिकल टीम विराटवर उपचार करत आहे. तसंच श्रेयस अय्यर पोट खराब असल्यामुळे उपलब्ध नव्हता. बीसीसीआयच्या या माहितीमुळे अय्यर फिट असता तर हनुमा विहारीऐवजी त्यालाच संधी मिळाली असती, हे स्पष्ट होतं. श्रेयस अय्यर आणि हनुमा विहारी या दोघांनाही सेंच्युरियन टेस्टमध्ये संधी मिळाली नव्हती. या दोघांऐवजी अनुभवी चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना संधी देण्यात आली. पण या दोघांनाही मिळालेल्या संधीचं सोनं करता आलं नाही. पहिल्या टेस्टनंतर आता दुसऱ्या टेस्टमध्येही दोघं अपयशी ठरले आहेत. पुजारा 3 रनवर तर रहाणे पहिल्याच बॉलला शून्य रनवर आऊट झाले आहेत. या दोघांची कामगिरी सातत्याने निराशाजनक होत आहे, त्यामुळे तिसऱ्या टेस्टमध्ये पुजारा-रहाणे या दोघांनाही बाहेर बसवून विराट आणि श्रेयस अय्यरच्या पुनरागमनाची शक्यता आहे. श्रेयस अय्यरने कानपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यातून टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. पहिल्याच टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये त्याने शतक आणि दुसऱ्या इनिंगमध्ये अर्धशतक केलं. यानंतर मुंबईमध्ये झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्येही अय्यर खेळला होता, पण त्याला मोठी खेळी करता आली नव्हती. हनुमा विहारीने मागची टेस्ट 2021 साली जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनीमध्ये खेळली. या टेस्टमध्ये दुखापत झाल्यानंतरही त्याने अश्विनच्या मदतीने भारताचा पराभव टाळला. विहारीने शेवटच्या इनिंगमध्ये 161 मिनीटं बॅटिंग केली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजआधी हनुमा विहारी इंडिया-ए साठी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यात त्याने 5 इनिंगमध्ये 3 अर्धशतकं केली, ज्यामुळे त्याने आपला टीम इंडियातला दावा आणखी मजबूत केला.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Shreyas iyer, South africa, Team india, Virat kohli

    पुढील बातम्या