Home /News /sport /

IND vs SA : 18 बॉल शून्य रन 3 विकेट, लॉर्ड ठाकूरच्या Memes चा धुमाकूळ!

IND vs SA : 18 बॉल शून्य रन 3 विकेट, लॉर्ड ठाकूरच्या Memes चा धुमाकूळ!

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या (India vs South Africa 2nd Test) दुसऱ्या दिवशी टीम इंडियाने शार्दुल ठाकूरच्या (Shardul Thakur) धमाकेदार बॉलिंगमुळे जोरदार पुनरागमन केलं आहे.

    जोहान्सबर्ग, 4 जानेवारी : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या (India vs South Africa 2nd Test) दुसऱ्या दिवशी टीम इंडियाने शार्दुल ठाकूरच्या (Shardul Thakur) धमाकेदार बॉलिंगमुळे जोरदार पुनरागमन केलं आहे. दिवसाच्या पहिल्या सत्रामध्ये शार्दुल ठाकूरने 18 बॉलमध्ये एकही रन न देता 3 विकेट घेतल्या. एकावेळी दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर 88/1 होता, पण लंचपर्यंत त्यांचा स्कोअर 102/4 एवढा झाला. टीम इंडियाने (Team India) पहिल्या इनिंगमध्ये 202 रन केले, त्यामुळे दक्षिण आफ्रिका अजूनही 100 रननी पिछाडीवर आहे. मॅचच्या दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने एक विकेट गमावून 35 रनवर सुरूवात केली. पहिला एक तास त्यांनी एकही विकेट गमावली नाही. ओपनर डीन एल्गार आणि कीगनर पीटरसन यांनी 53 रन जोडल्या. यानंतर शार्दुल ठाकूरने 39 व्या ओव्हरमध्ये कर्णधार डीन एल्गारला विकेट कीपर ऋषभ पंतकडून कॅच आऊट केलं. एल्गरने 120 बॉलमध्ये 28 रन केले होते, ज्यात 4 फोरचा समावेश होता. कीगन पीटरसनने पहिल्या टेस्टमध्येही संघर्ष करेला होता, यानंतर दुसऱ्या टेस्टमध्ये त्याने अर्धशतक झळकावलं. 118 बॉलमध्ये त्याने 62 रन केले, यात 9 फोरचा समावेश होता. शार्दुल ठाकूरच्या बॉलिंगवर पीटरसनने स्लिपमध्ये कॅच दिला. एल्गार आऊट झाल्यानंतर बॅटिंगला आलेला रस्सी व्हॅन डर डुसेनही एक रन करून शार्दुलचा शिकार झाला. शार्दुल ठाकूरने 3 विकेट घेतल्यामुळे टीम इंडियाने या सामन्यात पुनरागमन केलं आहे. यानंतर सोशल मीडियावर मीम्सने धुमाकूळ घातला आहे. टीम इंडिया तीन टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये 1-0 ने आघाडीवर आहे. हा सामना जिंकल्यास टेस्ट सीरिजमध्येही भारताचा विजय होईल. आतापर्यंत भारताला एकदाही दक्षिण आफ्रिकेत टेस्ट सीरिज जिंकता आलेली नाही.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Shardul Thakur, South africa, Team india

    पुढील बातम्या