• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IND vs SA 2nd Test : टीम इंडियाची बॅटिंग गडगडली, मोहम्मद शमीने घेतली पहिली विकेट

IND vs SA 2nd Test : टीम इंडियाची बॅटिंग गडगडली, मोहम्मद शमीने घेतली पहिली विकेट

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये इतिहास घडवण्यासाठी टीम इंडिया (India vs South Africa 2nd Test) मैदानात उतरत आहे. पण या सामन्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.

 • News18 Lokmat
 • | January 03, 2022, 21:11 IST
  LAST UPDATED 6 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  21:8 (IST)

  तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर 35/1, अजून 167 रननी पिछाडीवर, कीगन पीटरसन 14 रनवर, तर डीन एल्गार 11 रनवर नाबाद

  19:59 (IST)

  दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का, एडन मार्करम 7 रनवर आऊट, मोहम्मद शमीला मिळाली विकेट, दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर 14/1

  19:33 (IST)

  202 रनवर टीम इंडियाचा ऑल आऊट, कर्णधार केएल राहुलच्या 50 रन तर अश्विन 46 रन करून आऊट, भारताची मिडल ऑर्डर पुन्हा एकदा अपयशी. मार्को जेनसनने घेतल्या 4 विकेट, तर रबाडा आणि ओलिव्हरला मिळाल्या प्रत्येकी 3-3 विकेट

  19:22 (IST)

  भारताला नववा धक्का, अश्विन 46 रनवर आऊट, मार्को जेनसनला मिळाली विकेट, भारताचा स्कोअर 187/9

  19:17 (IST)

  भारताला आठवा धक्का, मोहम्मद शमी 9 रनवर आऊट, कागिसो रबाडाला मिळाली विकेट, भारताचा स्कोअर 185/8

  18:51 (IST)

  भारताला सातवा धक्का, शार्दुल ठाकूर शून्य रनवर आऊट, ओलिव्हरला मिळाली तिसरी विकेट, भारताचा स्कोअर 157/7

  18:44 (IST)

  भारताला सहावा धक्का, ऋषभ पंत 17 रनवर आऊट, मार्को जेनसनला मिळाली विकेट, भारताचा स्कोअर 146/6

  18:14 (IST)

  पहिल्या दिवसाच्या चहापर्यंत भारताचा स्कोअर 146/5, ऋषभ पंत 13 तर आर अश्विन 24 रनवर नाबाद

  17:50 (IST)

  भारताला पाचवा धक्का, केएल राहुल 50 रन करून आऊट, मार्को जेनसनने घेतली विकेट, पूल मारण्याच्या नादात कागिसो रबाडाने पकडला उत्कृष्ट कॅच. भारताचा स्कोअर 117/5

  17:12 (IST)

  भारताला चौथा धक्का, विहारी 20 रनवर आऊट, रबाडाला मिळाली विकेट, रस्सी व्हॅन डर डुसेनने पकडला उत्कृष्ट कॅच, भारताचा स्कोअर 91/4

  जोहान्सबर्ग, 3 जानेवारी : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये इतिहास घडवण्यासाठी टीम इंडिया (India vs South Africa 2nd Test) मैदानात उतरत आहे. पण या सामन्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. विराट कोहलीशिवायच (Virat Kohli) टीम इंडिया मैदानात उतरत आहे, त्यामुळे केएल राहुल (KL Rahul) भारताचा कर्णधार आहे. विराट कोहली पाठदुखीमुळे या मॅचमध्ये खेळत नसल्याचं राहुलने सांगितलं आहे. या सामन्यात केएल राहुलने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. विराट कोहलीऐवजी हनुमा विहारीला संधी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे क्विंटन डिकॉकने (Quinton De Kock) अचानक टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यामुळे त्याच्याऐवजी काईल व्हेरीन पदार्पण करत आहे. तर मल्डरऐवजी ड्युआन ओल्हीवरला संधी देण्यात आली आहे. याआधी सेंच्युरियनमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा 113 रननी दणदणीत विजय झाला होता. भारत आणि दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्गमध्ये आतापर्यंत 5 टेस्ट खेळल्या, यातल्या दोन मॅच भारताने जिंकल्या, तर तीन मॅच ड्रॉ झाल्या. 2018 साली झालेल्या मागच्या दौऱ्यात भारताने जोहान्सबर्गमध्ये विजय मिळवला होता. 2021 मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा ऑस्ट्रेलियात 2-1 ने पराभव केला, तर इंग्लंडमध्ये 2-1 ने आघाडी घेतली. आता दक्षिण आफ्रिकेमध्येही टेस्ट सीरिज जिंकून विक्रम करण्याची संधी विराटच्या नेतृत्वात खेळणाऱ्या टीम इंडियाला आहे. आतापर्यंत भारताच्या कोणत्याच कर्णधाराला अशी कामगिरी करता आलेली नाही. भारतीय टीम केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, आर.अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज दक्षिण आफ्रिकेची टीम डीन एल्गार, एडन मार्करम, कीगन पीटरसन, रस्सी व्हॅन डर डुसेन, टेम्बा बऊमा, काईल व्हेरीन, मार्को जेनसन, कागिसो रबाडा, केशव महाराज, डुआन ओल्हीवर, लुंगी एनगिडी