Home /News /sport /

IND vs SA : 2 वर्ष टीमबाहेर, 5 महिन्यांमध्ये बदललं नशीब, राहुल वनडेनंतर टेस्टचाही कॅप्टन!

IND vs SA : 2 वर्ष टीमबाहेर, 5 महिन्यांमध्ये बदललं नशीब, राहुल वनडेनंतर टेस्टचाही कॅप्टन!

केएल राहुल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये (India vs South Africa 2nd Test) टीम इंडियाचं नेतृत्व करत आहे. विराट कोहली (Virat Kohli) पाठीच्या दुखापतीमुळे ही टेस्ट खेळत नाहीये, त्यामुळे राहुलला ही जबाबदारी देण्यात आली आहे.

पुढे वाचा ...
    जोहान्सबर्ग, 3 जानेवारी : केएल राहुल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये (India vs South Africa 2nd Test) टीम इंडियाचं नेतृत्व करत आहे. विराट कोहली (Virat Kohli) पाठीच्या दुखापतीमुळे ही टेस्ट खेळत नाहीये, त्यामुळे राहुलला ही जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय राहुल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन वनडे मॅचच्या सीरिजमध्येही (ODI Series) टीम इंडियाचा कर्णधार असेल. रोहित शर्मा (Rohit Sharma) वेळेत फिट न झाल्यामुळे राहुलला वनडे टीमचीही कॅप्टन्सी देण्यात आली. मागच्या 5 महिने केएल राहुलच्या करियरमधले सर्वोत्तम राहिले आहेत. दोन वर्ष तो टेस्ट टीममधून बाहेर होता, त्यामुळे त्याच्या पुनरागमनाबाबत साशंकता होती. केएल राहुल ऑगस्ट 2019 ते 2021 पर्यंत टेस्ट टीमचा भाग नव्हता. ऑगस्ट 2021 साली त्याला इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये खेळण्याची संधी मिळाली. यानंतर नॉटिंघम टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये त्याने 84 रन तर दुसऱ्या इनिंगमध्ये 26 रन केले. हा सामना ड्रॉ झाला. यानंतर लॉर्ड्सवर झालेल्या मॅचमध्ये त्याने शानदार शतक केलं आणि टीमला चांगली सुरुवात करून दिली. या टेस्टमध्ये भारताचा 151 रननी विजय झाला. निलंबन ते टीम इंडियाचा कर्णधार, केएल राहुल 3 वर्षांमध्ये झाला झिरो ते हिरो! 5 इनिंगमध्ये फेल झाल्यानंतर शतक लॉर्ड्स टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये शतक केल्यानंतर केएल राहुलला पुढच्या 5 इनिंगमध्ये खास कामगिरी करता आली नाही. या दरम्याने त्याने 5, 0, 8, 17, 46 रन केले. मग न्यूझीलंडविरुद्ध (India vs New Zealand) दुखापतीमुळे तो खेळू शकला नाही. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये त्याने चांगली सुरुवात केली. सेंच्युरियनमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये राहुलने 123 रन केले, भारताने या सामन्यात विजय मिळवला. टेस्टमध्ये 7 शतकं केएल राहुलची ही 42 वी टेस्ट आहे. आतापर्यंत 71 इनिंगमध्ये त्याने 37 च्या सरासरीने 2,486 रन केल्या आहेत, यात 7 शतकं आणि 12 अर्धशतकांचा समावेश आहे. 199 रन हा त्याचा सर्वाधिक स्कोअर आहे. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात राहुल नव्या टीमकडून खेळणार आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Kl rahul, South africa, Team india, Virat kohli

    पुढील बातम्या