Home /News /sport /

IND vs SA : सेंच्युरियननंतर जोहान्सबर्गमध्येही पाऊस खेळ खराब करणार? पाहा Weather Report

IND vs SA : सेंच्युरियननंतर जोहान्सबर्गमध्येही पाऊस खेळ खराब करणार? पाहा Weather Report

भारत आणि दक्षिण आफ्रिकेतल्या दुसऱ्या टेस्टला (India vs South Africa 2nd Test) सोमवार 3 जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. जोहान्सबर्गच्या वॉन्डरर्स स्टेडियममध्ये हा सामना होईल.

    जोहान्सबर्ग, 2 जानेवारी : भारत आणि दक्षिण आफ्रिकेतल्या दुसऱ्या टेस्टला (India vs South Africa 2nd Test) सोमवार 3 जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. जोहान्सबर्गच्या वॉन्डरर्स स्टेडियममध्ये हा सामना होईल. या सीरिजमध्ये भारत आधीपासूनच 1-0 ने आघाडीवर आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता मॅचला सुरूवात होईल. मॅचच्या पहिल्या दिवशी जोहान्सबर्गचं तापमान (Johannesburg Weather) 14 ते 26 डिग्री सेल्सियसपर्यंत असेल, तसंच पुढचे पाच दिवस काही काळ पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान खात्याचा हा अंदाज पाहता सेंच्युरियन प्रमाणेच जोहान्सबर्गमध्येही पाऊस खेळ खराब करण्याची शक्यता आहे. सेंच्युरियनमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टवेळीही दुसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे होऊ शकला नव्हता. सेंच्युरियनमध्ये शानदार विजय झाल्यामुळे जोहान्सबर्गमध्ये होणाऱ्या दुसऱ्या टेस्टआधी टीम इंडिया चांगल्या स्थितीमध्ये आहे. जोहान्सबर्गच्या या मैदानात भारताचं रेकॉर्डही चांगलं आहे. भारताने वॉन्डरर्समध्ये एकही टेस्ट मॅच गमावलेली नाही. वॉन्डरर्सच्या या मैदानात टीम इंडियाने 5 टेस्ट खेळल्या, यातल्या दोन मॅच भारताने जिंकल्या, तर तीन मॅच ड्रॉ झाल्या. 2018 साली झालेल्या मागच्या दौऱ्यात भारताने जोहान्सबर्गमध्ये विजय मिळवला होता. असं असणार हवामान वेदर डॉट कॉमने वर्तवलेल्या अंदाजानुसार 3 जानेवारीला जोहान्सबर्गमध्ये सकाळचं तापमान 27 डिग्री तर रात्रीचं तापमान 15 डिग्री असेल. सकाळी आकाशात ढग नसतील, पण दुपारी विजांच्या कडकडाटासह थोडा पाऊस पडू शकतो. सकाळी पावसाची शक्यता नसली तरी दुपारी पावसाची 70 टक्के शक्यता आहे, त्यामुळे पहिला दिवस पावसाने प्रभावित होऊ शकतो. जोहान्सबर्गच्या मैदानात टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये सरासरी स्कोअर 280-350 च्या आसपास, तर दुसऱ्या इनिंगचा सरासरी स्कोअर 200-300 रन आहे, त्यामुळे या सामन्यात चांगल्या स्कोअरची अपेक्षा केली जाऊ शकते. जोहान्सबर्गची खेळपट्टी फास्ट बॉलिंगसाठी अनुकूल असली तरी बॅटरनाही मोठा स्कोअर करण्याची संधी असते. सेंच्युरियनमध्ये विजय सेंच्युरियनमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये विराट कोहलीने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. यानंतर केएल राहुलने 123 रनची महत्त्वाची खेळी केली, तर मयंक अग्रवालने 60 रन करून त्याला चांगली साथ दिली, त्यामुळे भारताला पहिल्या इनिंगमध्ये 327 रनपर्यंत मजल मारता आली. यानंतर भारताने दक्षिण आफ्रिकेला 197 रनवर रोखलं त्यामुळे टीमला 130 रनची आघाडी मिळाली. मोहम्मद शमीने 5 विकेट घेतल्या. भारताला दुसऱ्या इनिंगमध्ये 174 रनच करता आले. कोणत्याच खेळाडूला अर्धशतक करता आलं नाही. ऋषभ पंतने सर्वाधिक 34 रनची खेळी केली. 305 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा 191 रनवर ऑल आऊट झाला, आणि भारताने ही टेस्ट 113 रननी जिंकली.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: South africa, Team india

    पुढील बातम्या