• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IND vs SA 2nd Test : भारताचं 240 रनचं आव्हान, दक्षिण आफ्रिकेची झुंज सुरू

IND vs SA 2nd Test : भारताचं 240 रनचं आव्हान, दक्षिण आफ्रिकेची झुंज सुरू

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या टेस्टचा (India vs South Africa 2nd Test) आजचा तिसरा दिवस आहे. हा दिवस चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांच्या करियरसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.

 • News18 Lokmat
 • | January 05, 2022, 21:12 IST
  LAST UPDATED 5 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  21:8 (IST)

  तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर 118/2, डीन एल्गार 46 रनवर तर रस्सी व्हॅन डर डुसेन 11 रनवर नाबाद, दक्षिण आफ्रिकेला अजून विजयासाठी 122 रनची गरज, शार्दुल ठाकूर आणि अश्विनला 1-1 विकेट

  20:6 (IST)

  दक्षिण आफ्रिकेला दुसरा धक्का, अश्विनने कीगन पीटरसनला केलं एलबीडब्ल्यू, दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर 93/2, विजयासाठी अजून 147 रनची गरज. कुंबळेनंतर वॉन्डरर्सवर विकेट घेणारा अश्विन दुसरा भारतीय स्पिनर

  18:25 (IST)

  भारताने दिलेल्या 240 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची आक्रमक सुरूवात, चहापर्यंत स्कोअर 34/0, एडन मार्करम 24 रनवर तर डीन एल्गार 10 रनवर नाबाद

  17:32 (IST)

  भारताचा 266 रनवर ऑल आऊट, दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 240 रनची गरज, हनुमा विहारीची टेलएंडर्ससोबत 40 रनची झुंजार खेळी. चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेची झुंजार अर्धशतकं, तर शार्दुल ठाकूरनेही 24 बॉलमध्ये केले 28 रन. दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी आणि मार्को जेनसनला मिळाल्या प्रत्येकी 3-3 विकेट, डुआन ओलिव्हरला एक विकेट घेण्यात यश

  17:10 (IST)

  भारताला नववा धक्का, जसप्रीत बुमराह 7 रनवर आऊट, लुंगी एनगिडीला मिळाली विकेट, भारताचा स्कोअर 245/9, आघाडी 218 रनची

  16:51 (IST)

  भारताला आठवा धक्का, मोहम्मद शमी शून्य रनवर आऊट, मार्को जेनसनला मिळाली विकेट, भारताचा स्कोअर 228/8, आघाडी 201 रनची

  16:42 (IST)

  भारताला सातवा धक्का, शार्दुल ठाकूर 24 बॉलमध्ये 28 रन करून आऊट, मार्को जेनसनला मिळाली विकेट, भारताचा स्कोअर 225/7, आघाडी 198 रनची

  15:38 (IST)

  तिसऱ्या दिवसाच्या लंचपर्यंत भारताचा स्कोअर 188/6, आघाडी 161 रनची, हनुमा विहारी 6 रनवर तर शार्दुल ठाकूर 4 रनवर नाबाद. पहिल्या सत्रात भारताने गमावल्या चार विकेट. चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे अर्धशतक करून आऊट. ऋषभ पंत शून्य रनवर आणि अश्विन 16 रन करून माघारी

  15:28 (IST)

  भारताला सहावा धक्का, अश्विन 16 रनवर आऊट, लुंगी एनगिडीला मिळाली विकेट, भारताचा स्कोअर 184/6, आघाडी 157 रन

  15:3 (IST)

  भारताला पाचवा धक्का, ऋषभ पंत शून्य रनवर आऊट, कागिसो रबाडाला मिळाली विकेट, भारताचा स्कोअर 167/5, आघाडी 140 रनची

  जोहान्सबर्ग, 5 जानेवारी : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या टेस्टचा (India vs South Africa 2nd Test) आजचा तिसरा दिवस आहे. हा दिवस चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्या करियरसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. गेल्या काही काळापासून दोघांनाही मोठा स्कोअर करता आलेला नाही. ज्यामुळे त्यांचं टीममधलं स्थान धोक्यात आलं आहे. पहिल्या इनिंगमध्ये पुजारा 3 रनवर तर रहाणे पहिल्याच बॉलला शून्य रनवर आऊट झाला होता. यानंतर जोहान्सबर्ग टेस्टची दुसरी इनिंग दोघांसाठी अखेरची संधी ठरू शकते, असं सुनिल गावसकर म्हणाले होते. भारतीय टीम तिसऱ्या दिवसाची सुरुवात 85/2 अशी करेल, टीमकडे सध्या 58 रनची आघाडी आहे. चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) 35 रनवर आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) 11 रनवर खेळत आहेत. जोहान्सबर्ग टेस्टचा दुसरा दिवस गाजवला तो शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur). शार्दुलने घेतलेल्या 7 विकेटच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेला 229 रनवर रोखलं, त्यामुळे त्यांना फक्त 27 रनची आघाडी मिळाली. मॅचच्या पहिल्या दिवशी भारताचा 202 रनवर ऑल आऊट झाला होता. भारताला दक्षिण आफ्रिकेमध्ये अजून एकदाही टेस्ट सीरिज जिंकता आलेली नाही. याआधी सेंच्युरियनमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये भारताने शानदार विजय मिळवला होता. आता जोहान्सबर्ग टेस्टच्या तिसऱ्या दिवशी उत्कृष्ट खेळ करून दक्षिण आफ्रिकेला सामन्यातून बाहेर काढत ऐतिहासिक सीरिज जिंकण्याची संधी टीम इंडियाला आहे.