Home /News /sport /

IND vs SA : 3 नंबरवर बॅटिंग आणि 33 बॉल 3 रन, 33 वर्षांच्या पुजाराचा 3 सोबत 36 चा आकडा!

IND vs SA : 3 नंबरवर बॅटिंग आणि 33 बॉल 3 रन, 33 वर्षांच्या पुजाराचा 3 सोबत 36 चा आकडा!

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या टेस्टला (India vs South Africa 2nd Test) जोहान्सबर्गमध्ये सुरुवात झाली आहे. या मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) पुन्हा एकदा अपयशी ठरला आहे.

    जोहान्सबर्ग, 3 जानेवारी : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या टेस्टला (India vs South Africa 2nd Test) जोहान्सबर्गमध्ये सुरुवात झाली आहे. पाठीच्या दुखापतीमुळे विराट कोहली (Virat Kohli) या मॅचमध्ये खेळू शकला नाही, त्याच्याऐवजी केएल राहुलला (KL Rahul) टीमचं नेतृत्व देण्यात आलं. या सामन्यात राहुलने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. 14 ओव्हरपर्यंत राहुलचा हा निर्णय योग्य वाटला, कारण राहुलने मयंक अग्रवालसोबत (Mayank Agarwal) 36 रन केले होते. पण 15 व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलला मार्को जेनसनने मयंकची विकेट घेतली. यानंतर भारतीय इनिंग गडगडली. 8 ओव्हरनंतर डुआन ओलिव्हरने लागोपाठ दोन बॉलला चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणेची (Ajinkya Rahane) विकेट घेत टीम इंडियाला अडचणीत आणलं. अजिंक्य रहाणे तर पहिल्याच बॉलला शून्य रनवर आऊट झाला. पुजाराने 33 बॉलमध्ये 3 रन केले. चेतेश्वर पुजाराच्या या 3 रनच्या खेळीमुळे वेगळाच योगायोग बघायला मिळाला. 33 वर्षांचा पुजारा जोहान्सबर्ग टेस्टमध्ये तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला उतरला आणि त्याने 33 बॉलमध्ये 3 रनच केले, म्हणजेच पुजारा 3 च्या चक्रामध्ये अडकला. जोहान्सबर्ग टेस्ट सुरू होण्याची तारीखही 3 आहे. त्यामुळे पुजारासाठी 3 हा आकडा अनलकी ठरला. चेतेश्वर पुजारा गेल्या काही काळापासून खराब फॉर्ममध्ये आहे. सेंच्युरियन टेस्टच्या दोन्ही इनिंग मिळून पुजाराने 16 रन केले होते, पहिल्या इनिंगमध्ये तर तो पहिल्या बॉलला शून्य रनवर आऊट झाला. 2019 नंतर पुजाराला एकही शतक करता आलेलं नाही. 2020 नंतर 10 इनिंग खेळणाऱ्या भारतीयांची सरासरी बघितली तर पुजारा आठव्या क्रमांकावर आहे. त्याने या दरम्यान 25.52 च्या सरासरीने रन केले आहेत. रवींद्र जडेजाही 27 च्या सरासरीने पुजाराच्या पुढे आहे. मागच्यावर्षी सिडनी टेस्टमध्ये पुजाराने शानदार खेळी केली, पण यानंतर त्याच्या बॅटमधून रनच आले नाहीत. मागच्या एका वर्षात पुजाराने 15 टेस्टमध्ये 27 च्या सरासरीने 705 रन केले. त्याचा सर्वाधिक स्कोअर 91 रन होता.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Pujara, South africa, Team india

    पुढील बातम्या