Home /News /sport /

IND vs SA : पुजारा-रहाणे करियर वाचवण्यासाठी मैदानात, भारताकडे महत्त्वाची आघाडी

IND vs SA : पुजारा-रहाणे करियर वाचवण्यासाठी मैदानात, भारताकडे महत्त्वाची आघाडी

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या दिवसाचा (India vs South Africa 2nd Test) खेळ संपला आहे. आपलं करियर वाचवण्यासाठी खेळणारे चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) 35 रनवर आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) 11 रनवर खेळत आहेत.

पुढे वाचा ...
    जोहान्सबर्ग, 4 जानेवारी : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या दिवसाचा (India vs South Africa 2nd Test) खेळ संपला आहे. दिवसाअखेरीस भारताचा स्कोअर 85/2 झाला आहे, त्यामुळे टीमची आघाडी 58 रनची झाली आहे. आपलं करियर वाचवण्यासाठी खेळणारे चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) 35 रनवर आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) 11 रनवर खेळत आहेत. गेल्या काही काळापासून पुजारा आणि रहाणे यांना वारंवार अपयश येत आहे, त्यामुळे त्यांचं टीममधलं स्थान धोक्यात आलं आहे. पहिल्या इनिंगमध्ये अपयशी ठरल्यानंतर सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनीही या टेस्टची दुसरी इनिंग दोघांच्या करियरमधली शेवटची संधी असू शकते, अशी भविष्यवाणी केली होती. आता या टेस्टचा तिसरा दिवस पुजारा आणि रहाणेसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. या टेस्ट मॅचचा दुसरा दिवस गाजवला तो शार्दुल ठाकूरने. दिवसाची सुरुवात दक्षिण आफ्रिकेने 35/1 अशी केली होती. एकावेळी दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर 88/1 होता, पण शार्दुल ठाकूरने 18 बॉलमध्येच एकही रन न देता तीन विकेट घेतल्या, त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा लंचपर्यंत स्कोअर 102/4 एवढा झाला. शार्दुलने या इनिंगमध्ये 7 विकेट घेतल्या, तर मोहम्मद शमीला 2 आणि जसप्रीत बुमराहला एक विकेट मिळाली. दक्षिण आफ्रिकेचा 229 रनवर ऑल आऊट झाल्यामुळे त्यांना 27 रनची आघाडी मिळाली. मॅचच्या पहिल्या दिवशी भारताचा 202 रनवर ऑल आऊट झाला होता. भारताला दक्षिण आफ्रिकेमध्ये अजून एकदाही टेस्ट सीरिज जिंकता आलेली नाही. याआधी सेंच्युरियनमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये भारताने शानदार विजय मिळवला होता. आता जोहान्सबर्ग टेस्टच्या तिसऱ्या दिवशी उत्कृष्ट खेळ करून दक्षिण आफ्रिकेला सामन्यातून बाहेर काढत ऐतिहासिक सीरिज जिंकण्याची संधी टीम इंडियाला आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Ajinkya rahane, Pujara, South africa, Team india

    पुढील बातम्या