Home /News /sport /

IND vs SA : पुजारा-रहाणे पुन्हा फ्लॉप, गावसकरांनी केली मोठी भविष्यवाणी

IND vs SA : पुजारा-रहाणे पुन्हा फ्लॉप, गावसकरांनी केली मोठी भविष्यवाणी

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा (India vs South Africa) 202 रनवर ऑल आऊट झाला. तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला आलेला चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि चौथ्या क्रमांकावर आलेला अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) पुन्हा फ्लॉप ठरले. यानंतर कॉमेंट्री करणाऱ्या सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे.

पुढे वाचा ...
    जोहान्सबर्ग, 3 जानेवारी : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा (India vs South Africa) 202 रनवर ऑल आऊट झाला. केएल राहुल (KL Rahul) आणि मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) यांनी भारताला सावध सुरुवात करून दिली, पण टीमची मधली फळी पुन्हा एकदा अपयशी ठरली. विराट कोहलीच्या (Virat Kohli) अनुपस्थितीमध्ये टीममधल्या वरिष्ठ खेळाडूंनी जबाबदारीने खेळण्याची गरज होती, पण तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला आलेला चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि चौथ्या क्रमांकावर आलेला अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) पुन्हा फ्लॉप ठरले. डुआन ओलिव्हरने दोघांनाही पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. पुजारा आणि रहाणे लागोपाठ दोन बॉलला आऊट झाल्यानंतर कॉमेंट्री करणाऱ्या सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे. चेतेश्वर पुजारा 33 बॉलमध्ये 3 रन करून आऊट झाला. ओलिव्हरने ऑफ स्टम्पबाहेर शॉर्ट ऑफ लेंथ बॉल टाकला आणि पॉईंटवर उभ्या असलेल्या टेम्बा बऊमाने सोपा कॅच पकडला. यानंतर पुढच्याच बॉलला अजिंक्य रहाणेने तिसऱ्या स्लिपमध्ये उभ्या असलेल्या कीगन पीटरसनला कॅच दिला. यानंतर सुनिल गावसकरांनी पुजारा आणि रहाणे यांच्यासाठी जोहान्सबर्ग टेस्टची दुसरी इनिंग करियरमधली शेवटची संधी असू शकते, अशी प्रतिक्रिया दिली आहे. 3 नंबरवर बॅटिंग आणि 33 बॉल 3 रन, 33 वर्षांच्या पुजाराचा 3 सोबत 36 चा आकडा! 'हे दोघंही आऊट झाल्यानंतर कोणीही सांगू शकतं, की पुढची इनिंग त्यांच्यासाठी शेवटची असेल. या इनिंगमध्ये त्यांना आपलं टेस्ट करियर वाचवावं लागेल. टीममधल्या त्यांच्या जागेवर प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. आऊट झाल्यानंतर आता त्यांच्याकडे फक्त एक इनिंग शिल्लक आहे. भारताची बॅटिंग जशी सुरू आहे, ते बघता या दोघांना दुसऱ्या इनिंगमध्ये रन करण्याची संधी मिळेल,' असं गावसकर कॉमेंट्री करताना म्हणाले. पाठीच्या दुखापतीमुळे विराट कोहली या मॅचमध्ये खेळत नाहीये. त्याच्याऐवजी केएल राहुलला टीमची कॅप्टन्सी देण्यात आली आहे, तर जसप्रीत बुमराह उपकर्णधार आहे. चेतेश्वर पुजाराने जानेवारी 2019 नंतर शतक केलेलं नाही, तर अजिंक्य रहाणेचा फॉर्मही मागच्या एका वर्षापासून खराब आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Ajinkya rahane, Pujara, South africa, Team india

    पुढील बातम्या