Home /News /sport /

IND vs SA 2nd T20 : टीम इंडियाच्या खेळाडूचं करियर संकटात, पंतने दुसऱ्या सामन्यातही दिली नाही संधी

IND vs SA 2nd T20 : टीम इंडियाच्या खेळाडूचं करियर संकटात, पंतने दुसऱ्या सामन्यातही दिली नाही संधी

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियात (India vs South Africa) कोणताच बदल करण्यात आला नाही, त्यामुळे भारतीय टीममधल्या 27 वर्षांच्या खेळाडूचं करियर संकटात सापडलं आहे.

    कटक, 12 जून : भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यामध्ये (India vs South Africa 2nd T20) दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बऊमाने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. या सामन्यात टीम इंडियाने कोणताही बदल केला नाही. पहिल्या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला, त्यामुळे दुसऱ्या मॅचवेळी टीम इंडियात बदल होईल, असं वाटत होतं. रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह या दिग्गजांशिवाय टीम इंडिया या सीरिजमध्ये खेळत आहे. आयपीएलमधल्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर ऑलराऊंडर हार्दिक पांड्याचं (Hardik Pandya) टीम इंडियात कमबॅक झालं आहे. पहिल्या टी-20 सामन्यात हार्दिकने आक्रमक खेळी करत भारताचा स्कोअर 210 रनच्या पुढे पोहोचवला, याशिवाय त्याने बॉलिंगही केली. हार्दिकच्या या ऑलराऊंड कामगिरीमुळे व्यंकटेश अय्यरला (Venkatesh Iyer) बेंचवरच बसावं लागत आहे. करियर संकटात व्यंकटेश अय्यर टी-20 वर्ल्ड कप 2021 नंतर टीम इंडियाच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये होता, पण तेव्हा हार्दिक पांड्या दुखापतीमुळे टीम इंडिया बाहेर होता. हार्दिकच्या पुनरागमनामुळे मात्र व्यंकटेश अय्यरचं करियर संकटात सापडलं आहे. व्यंकटेश अय्यरला टीममध्ये हार्दिक पांड्याचा बॅकअप म्हणून ठेवण्यात आलं आहे. अय्यर खराब फॉर्ममध्ये आयपीएल 2021 मध्ये केलेल्या धमाकेदार कामगिरीमुळे व्यंकटेश अय्यरची टीम इंडियामध्ये निवड झाली, पण सहा महिन्यांमध्येच अय्यर फॉर्मसाठी संघर्ष करत आहे. आयपीएल 2022 आधी केकेआरने व्यंकटेश अय्यरला 8 कोटी रुपयांना रिटेन केलं, पण या मोसमात त्याने 12 मॅचमध्ये 16.55 च्या सरासरीने 182 रन केले. खराब कामगिरीमुळे केकेआरने व्यंकटेश अय्यरला टीमबाहेरही केलं होतं.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: South africa, Team india

    पुढील बातम्या