Home /News /sport /

IND vs SA 2nd T20 : दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला, या Playing XI सह टीम इंडिया मैदानात

IND vs SA 2nd T20 : दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला, या Playing XI सह टीम इंडिया मैदानात

Photo-BCCI

Photo-BCCI

भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा (India vs South Africa 2nd T20) कर्णधार टेम्बा बऊमाने (Temba Bavuma) टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टीममध्ये दोन बदल केले आहेत.

    कटक, 12 जून : भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा (India vs South Africa 2nd T20) कर्णधार टेम्बा बऊमाने (Temba Bavuma) टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टीममध्ये दोन बदल केले आहेत. क्विंटन डिकॉक (Quinton De Kock) आणि ट्रिस्टन स्टब्स दुखापतीमुळे खेळत नाहीयेत, त्यांच्याऐवजी रिझा हेन्ड्रिक्स आणि हेनरिच क्लासिन यांना संधी देण्यात आली आहे, दुसरीकडे भारताने टीममध्ये कोणताही बदल केलेला नाही. पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाची बॅटिंग चमकली आणि त्यांनी 211 रनचा डोंगर उभारला, पण हे आव्हान रोखणं भारतीय बॉलर्सना शक्य झालं नाही. रस्सी व्हॅन डर डुसेन आणि मिलर यांनी आक्रमक बॅटिंग करत दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून दिला होता. आता सीरिजमध्ये बरोबरी साधण्यासाठी टीम इंडियाला हा सामना जिंकणं गरजेचं आहे. Live Score पाहण्यासाठी क्लिक करा भारतीय टीम इशान किशन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, आवेश खान दक्षिण आफ्रिकेची टीम टेम्बा बऊमा, रिझा हेन्ड्रिक्स, रस्सी व्हॅन डर डुसेन, डेव्हिड मिलर, हेनरिच क्लासिन, ड्वॅन प्रिटोरियस, वेन पारनेल, केशव महाराज, तबरेझ शम्सी, कागिसो रबाडा, एनरिच नॉर्किया
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: South africa, Team india

    पुढील बातम्या