Home /News /sport /

IND vs SA : एका वर्षात 5 चान्स मिळूनही फेल, टीम इंडियाच्या 'पुणेकर' खेळाडूचं काय चुकतंय?

IND vs SA : एका वर्षात 5 चान्स मिळूनही फेल, टीम इंडियाच्या 'पुणेकर' खेळाडूचं काय चुकतंय?

ऋतुराज गायकवाड भारतासाठी (Ruturaj Gaikwad Team India) 5 टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच खेळला, पण यातल्या एकही सामन्यात त्याला 25 रनही करता आल्या नाहीत. या कामगिरीमुळे ऋतुराज गायकवाड टीम इंडियातून बाहेर व्हायच्या मार्गावर आहे.

    कटक, 12 जून : ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) आयपीएल 2021 मध्ये (IPL 2021) धमाकेदार बॅटिंग केली होती आणि ऑरेंज कॅप जिंकली होती. ऋतुराज गायकवाडच्या या शानदार कामगिरीच्या जोरावर सीएसके (CSK) चौथ्यांदा चॅम्पियन झाली होती. या फॉर्ममुळे ऋतुराज गायकवाडची टीम इंडियात निवड झाली होती. तेव्हापासून ऋतुराज भारतासाठी 5 टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच खेळला, पण यातल्या एकही सामन्यात त्याला 25 रनही करता आल्या नाहीत. या कामगिरीमुळे ऋतुराज गायकवाड टीम इंडियातून बाहेर व्हायच्या मार्गावर आहे. आयपीएल 2022 मध्येही (IPL 2022) ऋतुराजची कामगिरी निराशाजनक झाली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात (India vs South Africa 2nd T20) ऋतुराज एक रन करून आऊट झाला. 25 वर्षांचा ऋतुराज पहिल्या टी-20 मध्येही कमाल करू शकला नाही. 15 बॉलमध्ये 23 रन करून तो पॅव्हेलियनमध्ये परतला होता. त्याआधी ऋतुराज 3 टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच खेळला, यात तो 21, 14 आणि 4 रन करून आऊट झाला. यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियात टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) होणार आहे, त्याआधी निवड समिती वेगवेगळ्या खेळाडूंना संधी देत आहे, पण या संधीचं ऋतुराजला सोनं करण्यात अपयश येत आहे. दुसरीकडे इशान किशनने पहिल्या टी-20 सामन्यात अर्धशतक केलं, तर दुसऱ्या सामन्यात तो 21 बॉलमध्ये 34 रन केले. सीनियर खेळाडू शिखर धवनने आयपीएल 2022 मध्ये चांगली कामगिरी करूनही त्याला टीममध्ये जागा मिळाली नाही. ऋतुराजचं टी-20 क्रिकेटमधलं रेकॉर्ड ऋतुराज गायकवाडचं टी-20 क्रिकेटमधलं रेकॉर्ड चांगलं आहे. या मॅचआधी त्याने 78 सामन्यांमध्ये 35 च्या सरासरीने 2,465 रन केले आहेत, यात एक शतक आणि 19 अर्धशतकांचा समावेश आहे. म्हणजेच त्याने 20 वेळा 50 किंवा त्यापेक्षा जास्तचा स्कोअर केला आहे. त्याचा स्ट्राईक रेट 133 चा आहे. दुसऱ्या टी-20 मध्ये कागिसो रबाडाने ऋतुराजची विकेट घेतली, ही रबाडाची टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली 50वी विकेट होती.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: South africa, Team india

    पुढील बातम्या