Home /News /sport /

IND vs SA : शून्यवर आऊट झाल्यानंतरही विराट खूश, ड्रेसिंग रूममध्ये केला डान्स, VIDEO

IND vs SA : शून्यवर आऊट झाल्यानंतरही विराट खूश, ड्रेसिंग रूममध्ये केला डान्स, VIDEO

विराट कोहलीच्या (Virat Kohli) करियरसाठी गेले काही महिने अत्यंत निराशाजनक राहिले. एकीकडे मैदानातला संघर्ष आणि दुसरीकडे कॅप्टन्सीचा वाद या चक्रव्यूहात अडकलेला असतानाही विराटचं खेळाचा आनंद घेणं काही कमी झालं नाही. ड्रेसिंग रूममध्ये बसलेला असताना विराटने डान्स (Virat Kohli Dance) केला.

पुढे वाचा ...
    पार्ल, 21 जानेवारी : विराट कोहलीच्या (Virat Kohli) करियरसाठी गेले काही महिने अत्यंत निराशाजनक राहिले. टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडल्यानंतर त्याला वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हटवण्यात आलं. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टेस्ट सीरिज संपल्यानंतर विराटने टेस्ट टीमच्या कॅप्टन्सीचाही राजीनामा दिला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये (India vs South Africa 2nd ODI) विराट शून्य रनवर आऊट झाला. वनडे करियरमध्ये विराट 14 व्यांदा शून्य रनवर आऊट झाला, पण पहिल्यांदाच त्याला स्पिनरने शून्यवर आऊट केलं. महाराजच्या बॉलिंगवर ड्राईव्ह मारताना विराटचं बॅटवरचं नियंत्रण सुटलं आणि त्याने एका हातानेच शॉट मारला, ज्यामुळे बॉल बऊमाच्या हातात गेला. नोव्हेंबर 2019 नंतर विराट कोहलीला शतक करता आलेलं नाही. एकीकडे मैदानातला संघर्ष आणि दुसरीकडे कॅप्टन्सीचा वाद या चक्रव्यूहात अडकलेला असतानाही विराटचं खेळाचा आनंद घेणं काही कमी झालं नाही. ड्रेसिंग रूममध्ये बसलेला असताना विराटने डान्स (Virat Kohli Dance) केला. विराटचा हा डान्स बघून बाजूलाच बसलेल्या असलेल्या शिखर धवनलाही हसू आवरलं नाही. भारताने या सामन्यात पहिले बॅटिंग करून 50 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावल्या आणि 287 रन केले. ऋषभ पंतने सर्वाधिक 85 रनची खेळी केली. याशिवाय केएल राहुलने 55 रन केले. पहिल्या सामन्यात अर्धशतक करणाऱ्या शार्दुल ठाकूरने नाबाद 40 आणि आर.अश्विनने नाबाद 25 रन केले.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: South africa, Team india, Virat kohli

    पुढील बातम्या