Home /News /sport /

IND vs SA : आफ्रिकेत सीरिज नाही 'लाज' गेली, टीम इंडियाच्या पराभवाची 5 कारणं

IND vs SA : आफ्रिकेत सीरिज नाही 'लाज' गेली, टीम इंडियाच्या पराभवाची 5 कारणं

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाचा (India vs South Africa 2nd ODI) 7 विकेटने पराभव झाला. याचसोबत भारताने वनडे सीरिजही गमावली आहे. याआधी टेस्ट सीरिजमध्येही टीम इंडियाचा पराभव झाला होता.

    पार्ल, 21 जानेवारी : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाचा (India vs South Africa 2nd ODI) 7 विकेटने पराभव झाला. याचसोबत भारताने वनडे सीरिजही गमावली आहे. याआधी टेस्ट सीरिजमध्येही टीम इंडियाचा पराभव झाला होता. दुसऱ्या वनडेमध्ये ना भारताची बॉलिंग चालली ना फिल्डिंग. कॅप्टन्सीमध्ये केएल राहुल पुन्हा एकदा अपयशी ठरला. भारताच्या या पराभवाची पाच कारणं समोर आली आहेत. भारताची टॉप ऑर्डर फेल भारताची टॉप ऑर्डर पुन्हा एकदा अपेक्षेनुसार खेळू शकली नाही. शिखर धवन (Shikhar Dhawan) 29 रनवर आऊट झाला, तर विराट (Virat Kohli) शून्य रनवर माघारी परतला. ओपनर केएल राहुलने (KL Rahul) अर्धशतक केलं, पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. 79 बॉलमध्ये 55 रन करून तो आऊट झाला. टॉप-3 बॅटर मोठा स्कोअर करू न शकल्यामुळे मधल्या फळीवरचा दबाव वाढला. दोन्ही अय्यरनी केलं निराश मधल्या फळीत ऋषभ पंतने (Rishabh Pant) 85 रन केले, त्याने राहुलच्या मदतीने टीम इंडियाचा डाव सावरला. पण पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेले श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) अपयशी ठरले. खालच्या फळीत खेळणाऱ्या शार्दुल (Shardul Thakur) आणि आर.अश्विन (R Ashwin) यांच्यामुळे भारताला 287 रनपर्यंत मजल मारता आली. शार्दुल ठाकूरने 40 आणि आर.अश्विनने 25 रन केले. नव्या बॉलने विकेट नाही भारतीय बॉलरना दक्षिण आफ्रिकेच्या बॅटिंगला रोखता आलं नाही. नव्या बॉलने विकेट न घेणं भारताच्या पराभवाचं प्रमुख कारण ठरलं. भुवनेश्वर कुमारला (Bhuvneshwar Kumar) अजूनही त्याचा जुना फॉर्म गवसला नाही. सुरुवातीच्या 4 ओव्हरमध्येच त्याने 40 रन दिले. पहिल्या 10 ओव्हरमध्ये एकही विकेट न मिळणं टीम इंडियासाठी अडचणीचं ठरलं. स्पिनरनाही करता आली नाही कमाल स्पिनर आर.अश्विन (R Ashwin) आणि युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) या दोन्ही स्पिनरनाही त्यांची कमाल दाखवता आली नाही. चहलने 10 ओव्हरमध्ये 47 रन देऊन 1 विकेट घेतली. अश्विनने तर या सामन्यात 68 रन दिले. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेच्या स्पिनरनी भारताच्या 4 विकेट घेतल्या. राहुलचे रक्षात्मक निर्णय कर्णधार केएल राहुलने शार्दुल ठाकूरला बॉलिंगवरून हटवलं जेव्हा त्याने विकेट घेतली होती. राहुलने शार्दुलऐवजी व्यंकटेश अय्यरला बॉलिंग दिली. राहुलचा हा निर्णय रक्षात्मक होता. राहुलने ओव्हर काढण्यासाठी व्यंकटेश अय्यरच्या हातात बॉल दिला, असं वाटत होतं. पण त्यावेळी भारताला विकेट घेऊन दक्षिण आफ्रिकेवर दबाव वाढवण्याची गरज होती.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Team india

    पुढील बातम्या