Home /News /sport /

IND vs SA : ऋषभ पंतचा गोंधळ, कॅप्टन राहुल भडकला, मैदानातल्या राड्याचा VIDEO

IND vs SA : ऋषभ पंतचा गोंधळ, कॅप्टन राहुल भडकला, मैदानातल्या राड्याचा VIDEO

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये (India vs South Africa 2nd ODI) टीम इंडियाचा कर्णधार केएल राहुलने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. यानंतर भारताने 50 ओव्हरमध्ये 287/6 पर्यंत मजल मारली. पण सामन्यामध्ये केएल राहुल (KL Rahul) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) यांच्यात मैदानात गोंधळ पाहायला मिळाला.

पुढे वाचा ...
    पार्ल, 21 जानेवारी : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये (India vs South Africa 2nd ODI) टीम इंडियाचा कर्णधार केएल राहुलने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. यानंतर भारताने 50 ओव्हरमध्ये 287/6 पर्यंत मजल मारली. केएल राहुल (KL Rahul) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) यांची अर्धशतकं आणि शार्दुल ठाकूर-आर.अश्विन यांच्यात झालेल्या नाबाद 48 रनच्या पार्टनरशीपमुळे भारताला या स्कोअरपर्यंत मजल मारता आली. ठाकूरने 38 बॉलमध्ये नाबाद 40 तर अश्विनने 24 बॉलमध्ये 25 रनची नाबाद खेळी केली. टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतल्यानंतर शिखर धवन आणि केएल राहुलच्या जोडीने भारताला चांगली सुरूवात करून दिली, पण 12 व्या ओव्हरला शिखर धवन 29 रनवर आऊट झाला. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला आलेला विराट कोहली लगेच शून्य रनवर माघारी परतला. लागोपाठ दोन विकेट गेल्यानंतर राहुलने ऋषभ पंतच्या मदतीने भारताचा डाव सावरला. राहुल आणि पंत यांच्यामध्ये 115 रनची पार्टनरशीप झाली. राहुलने 79 बॉलमध्ये 4 फोरच्या मदतीने 55 रन केल्या. तर पंतने 71 बॉलमध्ये 85 रन केले, यात 10 फोर आणि 2 सिक्सचा समावेश होता. ऋषभ पंत आणि केएल राहुल यांच्या पार्टनरशीपवेळी मात्र चांगलाच गोंधळ झाला. 15 व्या ओव्हरमध्ये ऋषभ पंतने घातलेल्या गोंधळामुळे राहुल रन आऊट झाला असता, पण दक्षिण आफ्रिकेच्या फिल्डरनी केलेल्या चुकांमुळे राहुलला जीवनदान मिळालं. केशव महाराजने टाकलेला बॉल ऋषभ पंतने मीड विकेटच्या दिशेने मारला आणि धावायला सुरूवात केली. पंत धावत असल्याचं पाहून राहुलही धावायला लागला, पण मध्येच पंत मागे फिरला आणि दोन्ही खेळाडू एकाच क्रीजवर आले. भारताचे दोन्ही खेळाडू एकाच ठिकाणी आल्याचं पाहून बऊमाने केशव महाराजच्या दिशेने बॉल थ्रो केला, पण महाराजला हा बॉल पकडता आला नाही. यानंतर पेहलुक्वायोच्या दिशेने बॉल गेला, पण त्यालाही एका प्रयत्नात बॉल पकडायला अपयश आलं. दक्षिण आफ्रिकेच्या फिल्डरनी घातलेल्या या गोंधळामुळे भारताची विकेट गेली नाही. ऋषभ पंतने अचानक माघार घेतल्यानंतर केएल राहुलच्या चेहऱ्यावरचा संताप दिसून येत होता. एवढंच नाही तर तो पंतला उद्देशून काहीतरी बोललादेखील. पण राहुलला जेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनीही गोंधळ घातल्याचं समजलं तेव्हा तो विकेट वाचवण्यासाठी उलटा फिरला आणि धावत सुटला. हा गोंधळ झाला तेव्हा भारताचा स्कोअर 70/2 एवढा होता. या गोंधळानंतर मात्र दोन्ही खेळाडूंनी डाव सावरला आणि टीमला मोठ्या स्कोअरपर्यंत नेण्यास मदत केली.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Kl rahul, Rishabh pant, South africa, Team india

    पुढील बातम्या