Home /News /sport /

IND vs SA : वनडे सीरिज वाचवण्यााचं आव्हान, टीम इंडियामध्ये होणार हे बदल!

IND vs SA : वनडे सीरिज वाचवण्यााचं आव्हान, टीम इंडियामध्ये होणार हे बदल!

Team India

Team India

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातली दुसरी वनडे (India vs South Africa 2nd ODI) शुक्रवारी खेळवण्यात येणार आहे. पहिल्या वनडेमध्ये पराभव झाल्यामुळे टीम इंडियासाठी दुसरी वनडे करो या मरो अशीच आहे.

    पार्ल, 20 जानेवारी : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातली दुसरी वनडे (India vs South Africa 2nd ODI) शुक्रवारी खेळवण्यात येणार आहे. पहिल्या वनडेमध्ये पराभव झाल्यामुळे टीम इंडियासाठी दुसरी वनडे करो या मरो अशीच आहे. या सामन्यातही पराभव झाला तर टेस्ट सीरिजनंतर वनडे सीरिज गमावण्याची नामुष्की टीमवर ओढवेल. पहिल्या वनडेमध्ये दक्षिण आफ्रिकेने भारताचा 31 रनने पराभव केला. पहिल्यांदा बॅटिंग करत आफ्रिकेने 296 रन केले. टेम्बा बऊमा आणि रस्सी व्हॅन डर डुसेन यांनी शतकं केली. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला 50 ओव्हरमध्ये 265/8 पर्यंतच मजल मारता आली. शिखर धवन (Shikhar Dhawan), विराट कोहली (Virat Kohli) आणि शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) यांनी अर्धशतकं केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या सामन्यात केएल राहुलने (KL Rahul) पहिल्यांदाच वनडे टीमचं नेतृत्व केलं, पण त्याच्या कॅप्टन्सीवरही शंका उपस्थित करण्यात आल्या. ऑलराऊंडर असलेल्या व्यंकटेश अय्यरने (Venkatesh Iyer) या सामन्यातून वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं, पण राहुलने त्याला बॉलिंग दिली नाही. पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवानंतर भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याने दुसऱ्या वनडेसाठी बदल करण्याचा सल्ला दिला आहे. दिनेश कार्तिक क्रिकबझसोबत बोलत होता. 'प्रसिद्ध कृष्णा किंवा मोहम्मद सिराज यांच्यापैकी एकाला संधी मिळेल. भुवी किंवा बुमराहला विश्रांती द्यायची का याचा निर्णय टीमला घ्यायचा आहे. मधल्या ओव्हरमध्ये कृष्णा किंवा सिराज फरक पाडू शकतात,' असं कार्तिक म्हणाला. 'व्यंकटेश अय्यरला बॉलिंग का दिली नाही, याबाबत केएल राहुल नक्कीच द्रविडला सांगेल. पण हे सगळ्यांसाठीच आश्चर्यकारक होतं. व्यंकटेशला सहाव्या क्रमांकावर बॅटिंग आणि थोडीफार बॉलिंग हीच भूमिका दिली गेली आहे. तुम्ही जर त्याला यापैकी एक करू देणार नसाल तर, मग त्याला घेण्याचा फायदा काय,' असा प्रश्न कार्तिकने विचारला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातली दुसरी वनडे पहिली मॅच झाली तिकडेच होणार आहे. यानंतर तिसरी आणि अखेरची वनडे केपटाऊनमध्ये रविवारी खेळवली जाईल.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: South africa, Team india

    पुढील बातम्या