Home /News /sport /

Virat Kohli vs BCCI वादात पाकिस्तान क्रिकेटर सलमान बटची उडी, BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीवर साधला निशाणा

Virat Kohli vs BCCI वादात पाकिस्तान क्रिकेटर सलमान बटची उडी, BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीवर साधला निशाणा

Virat Kohli vs BCCI

Virat Kohli vs BCCI

विराट कोहली (Virat Kohli) आणि बीसीसीआय (BCCI) यांच्यात सुरु असलेल्या वादामध्ये पाकिस्तानचा क्रिकेटर सलमान बट (Salman Butt) ने उडी घेतली आहे.

    नवी दिल्ली, 16 डिसेंबर: विराट कोहली (Virat Kohli) आणि बीसीसीआय (BCCI) यांच्यात सुरु असलेल्या वादामध्ये पाकिस्तानचा क्रिकेटर सलमान बट (Salman Butt) ने उडी घेतली आहे. त्याने दोघामधील सुरु असलेल्या वादाचे खरे कारण सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना बट म्हणाला की, कोहलीने बीसीसीआय अध्यक्षांबद्दल धक्कादायक गोष्टी सांगितल्या आहेत. ही काही छोटी गोष्ट नाही. गांगुली आणि कोहलीची दोन वेगवेगळी विधाने भारतीय संघात खळबळ निर्माण करू शकतात, असे मत त्याने यावेळी व्यक्त केले. गांगुलीने पुढे येऊन उत्तर द्यावे, अशी मागणीही त्याने यावेळी केली. ते बीसीसीआयचे अध्यक्ष आहेत आणि कोहलीने सार्वजनिक ठिकाणी धक्कादायक गोष्टी सांगितल्या आहेत, ही छोटी गोष्ट नसल्याचे बट याने म्हटले आहे. तसेच तो पुढे म्हणाला, खरतरं हा सुरु असलेला वाद रोहित शर्माला वनडे संघाचे कर्णधारपद दिल्याने सुरु नाही तर विराटकडून ज्या पद्धतीने हे कर्णधारपद काढून घेण्यात आले आहे. ती पद्धत चुकीची आहे. एक महान खेळाडूकडून कर्णधारपद दुसऱ्या एका खेळाडूला दिले गेले आहे. हे चुकचे घडले आहे. या वादामुळे गांगुली आणि कोहली याच्यातील विश्वास कमी होईल. असा विश्वासही बटने यावेळी व्यक्त केला. विराट कोहलीच्या वक्तव्यानंतर नेटीझन्सना आठवला अनिल कुंबळे, म्हणाले... भारतीय टेस्ट टीमचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्याआधी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टेस्ट टीमची घोषणा व्हायच्या दीड तास आधी मला वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हटवण्यात आल्याचं सांगण्यात आलं, असं विराट म्हणाला. टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडण्याआधी आपण बीसीसीआयला याबाबत माहिती दिली, पण याबाबत बीसीसीआयसोबत काहीच बोलणं झालं नाही, असा दावा विराटने केला.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: BCCI, Virat kohli

    पुढील बातम्या