मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs SA : 'विराट, तू पुन्हा त्याच चुका कशा करतोस?' कोहलीचे चाहतेही धक्क्यात

IND vs SA : 'विराट, तू पुन्हा त्याच चुका कशा करतोस?' कोहलीचे चाहतेही धक्क्यात

टीम इंडियाच्या टेस्ट टीमचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याचा रनचा दुष्काळ 2021 सालीही कायम राहिला. वर्षाच्या शेवटच्या इनिंगमध्ये (India vs South Africa 1st Test) विराट कोहली 18 रन करून आऊट झाला.

  • Published by:  Shreyas

सेंच्युरियन, 29 डिसेंबर : टीम इंडियाच्या टेस्ट टीमचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याचा रनचा दुष्काळ 2021 सालीही कायम राहिला. वर्षाच्या शेवटच्या इनिंगमध्ये (India vs South Africa 1st Test) विराट कोहली 18 रन करून आऊट झाला, त्यामुळे आता 2020 पाठोपाठ 2021 मध्येही विराट कोहलीला शतक करता आलेलं नाही. विराटचं अखेरचं शतक 2019 साली बांगलादेशविरुद्धच्या टेस्टमध्ये आलं होतं.

विराट कोहली ज्या पद्धतीने पुन्हा एकदा आऊट झाला आहे, त्यावर प्रश्न उपस्थित होत आहेत. मार्को जेनसनने टाकलेला बॉल ऑफ स्टम्पच्या खूपच बाहेर होता, तरीही विराटने ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न केला. ड्राईव्ह मारण्याच्या नादात विराटच्या बॅटच्या एजला बॉल लागला आणि दक्षिण आफ्रिकेचा विकेट कीपर क्विंटन डिकॉकने कॅच पकडला. लंचनंतरच्या पहिल्याच बॉलला विराटने त्याची विकेट गमावली. कॉमेंट्री करणाऱ्या सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनीही विराटच्या या शॉटवर नाराजी व्यक्त केली. याआधी पहिल्या इनिंगमध्येही विराट कोहली अशाच पद्धतीने ऑफ स्टम्प बाहेरचा बॉल मारण्याच्या नादात स्लिपमध्ये कॅच देऊन आऊट झाला होता. इंग्लंड दौऱ्यामध्येही विराट कोहली अनेकवेळा अशाच पद्धतीने ऑफ स्टम्प बाहेरचे बॉल खेळून आऊट झाला होता.

विराट कोहली अशापद्धतीने आऊट होत असल्यामुळे त्याला अनेकांनी सचिन तेंडुलकरकडून (Sachin Tendulkar) शिकण्याचाही सल्ला दिला. सचिनच्या करियरमध्येही अशीच एक वेळ आली होती, जेव्हा तो ऑफ स्टम्पबाहेर ड्राईव्ह मारताना आऊट व्हायचा. 2004 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये तो 241 रनवर नाबाद राहिला, या मॅरेथॉन इनिंगमध्ये सचिन एकही ड्राईव्ह खेळला नाही.

First published:

Tags: Virat kohli