Home /News /sport /

IND vs SA : 'याची काहीच गरज नाही', सिराजच्या मैदानातल्या वर्तनावर गावसकर संतापले

IND vs SA : 'याची काहीच गरज नाही', सिराजच्या मैदानातल्या वर्तनावर गावसकर संतापले

सेंच्युरियनमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा (India vs South Africa 1st Test) 113 रननी पराभव केला. तरी भारताचा फास्ट बॉलर मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) याने मैदानात केलेल्या वर्तनावर टीका करण्यात येत आहे. भारताचे महान खेळाडू सुनिल गावसकरही (Sunil Gavaskar) सिराजच्या या वर्तनावर नाराज झाले आहेत.

पुढे वाचा ...
    मुंबई, 1 जानेवारी : सेंच्युरियनमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा (India vs South Africa 1st Test) 113 रननी पराभव केला. पावसामुळे एका दिवसाचा खेळ फुकट गेला, तरी भारताने पाचव्या दिवशी दोन सत्र शिल्लक असतानाच सामना खिशात टाकला. याचसह 3 टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये टीम इंडियाने 1-0 ने आघाडी घेतली आहे. सेंच्युरियन टेस्टमध्ये टीम इंडियाचा अगदी सहज विजय झाला असला तरी भारताचा फास्ट बॉलर मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) याने मैदानात केलेल्या वर्तनावर टीका करण्यात येत आहे. भारताचे महान खेळाडू सुनिल गावसकरही (Sunil Gavaskar) सिराजच्या या वर्तनावर नाराज झाले आहेत. मोहम्मद सिराज पाचव्या दिवशी इनिंगची 62 वी ओव्हर टाकत होता, तेव्हा टेम्बा बऊमाने (Temba Bavuma) मारलेला बॉल सिराजच्या हातात गेला, यानंतर सिराजने बऊमाच्या दिशेने थ्रो केला. सिराजचा हा थ्रो बऊमाच्या पायाला लागला. बॉल लागल्यामुळे बऊमादेखील त्रासात होता, यानंतर दक्षिण आफ्रिकेचा फिजियो मैदानात आला. मोहम्मद सिराजनेही या प्रकारानंतर बऊमाची माफी मागितली, तसंच जवळ जाऊन त्याची विचारपूस केली. फिजियोने तपासल्यानंतर बऊमा पुन्हा बॅटिंग करायला लागला. तो 35 रनवर नाबाद राहिला. बऊमाने 80 बॉलचा सामना केला, ज्यात त्याने 4 फोरही मारल्या. बऊमाला बॉल मारल्यावरून गावसकर यांनी नाराजी व्यक्त केली. 'बऊमाने रन काढण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. तो जरा जास्तच आक्रमक होता, तसंच तो वाहवत गेला. सिराजला बऊमाच्या दिशेने थ्रो करण्याची काहीच गरज नव्हती. मैदानातल्या आक्रमकपणाबाबत सिराजसोबत कोणीतरी बोलणं गरजेचं आहे,' अशी संतप्त प्रतिक्रियाही गावसकर यांनी दिली.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: South africa, Team india

    पुढील बातम्या