मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs SA : ऋषभ पंतचं सेंच्युरियनमध्ये स्पेशल शतक, धोनीलाही टाकलं मागे!

IND vs SA : ऋषभ पंतचं सेंच्युरियनमध्ये स्पेशल शतक, धोनीलाही टाकलं मागे!

भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa 1st Test) यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) नावावर नवा विक्रम झाला आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa 1st Test) यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) नावावर नवा विक्रम झाला आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa 1st Test) यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) नावावर नवा विक्रम झाला आहे.

सेंच्युरियन, 28 डिसेंबर : भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa 1st Test) यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) नावावर नवा विक्रम झाला आहे. ऋषभ पंतने टेस्ट क्रिकेटमध्ये स्पेशल शतक पूर्ण केलं आहे. विकेट कीपर म्हणून पंतच्या 100 विकेट झाल्या आहेत. आपल्या 26 व्या टेस्टमध्ये पंतने हे रेकॉर्ड केलं आहे. याचबरोबर तो भारताचा सगळ्यात जलद 100 विकेट घेणारा भारताचा विकेट कीपर ठरला आहे. पंतने भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) आणि ऋद्धीमान साहा (Wriddhiman Saha) यांना मागे टाकलं आहे. या दोघांनीही 36 टेस्टमध्ये 100 विकेट पूर्ण केल्या होत्या. यानंतर किरण मोरेना 39 टेस्ट, नयन मोंगियाने 41 टेस्ट आणि सय्यद किरमाणी यांनी 42 टेस्टमध्ये हा टप्पा गाठला.

ऋषभ पंतने मोहम्मद शमीच्या (Mohammad Shami) बॉलिंगवर टेम्बा बऊमाचा कॅच पकडला आणि टेस्टमध्ये आपले 100 बळी पूर्ण केले. पंतने या सामन्यात एकूण 4 कॅच पकडले. त्याने पहिले दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गार, टेम्बा बऊमा, वियान मुल्डर आणि कागिसो रबाडाचा कॅच पकडला होता.

टेस्ट क्रिकेटमध्ये सगळ्यात जलद 100 बळींचा टप्पा ओलांडण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डिकॉकच्या (Quinton De Kock) नावावर आहे. डिकॉकने 22 टेस्टमध्ये 100 शिकार करण्याचा रेकॉर्ड केला होता.

पंत टेस्ट क्रिकेटमध्ये 100 विकेट घेणारा भारताचा सहावा विकेट कीपर आहे. धोनीने टेस्टमध्ये सर्वाधिक 294 विकेट घेतल्या, यात 256 कॅच आणि 38 स्टम्पिंगचा समावेश आहे. पंतने या टेस्टच्या आधी 25 मॅचमध्ये 89 कॅच आणि 7 स्टम्पिंग केले होते.

याआधी सेंच्युरियन टेस्टच्या तिसऱ्या दिवशी भारताचा 327 रनवर ऑल आऊट झाला. भारताने शेवटच्या 7 विकेट 55 रनमध्ये गमावल्या. यानंतर बॅटिंगला आलेल्या दक्षिण आफ्रिकेचा 197 रनवर ऑल आऊट झाला. मोहम्मद शमीने 5 विकेट घेतल्या, तर बुमराह आणि शार्दुल ठाकूरला प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या. मोहम्मद सिराजला एक विकेट घेण्यात यश आलं.

First published:
top videos

    Tags: MS Dhoni, Rishabh pant