सेंच्युरियन, 30 डिसेंबर : भारताने सेंच्युरियनमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेचा (India vs South Africa) 113 रननी पराभव केला. एका दिवसाचा खेळ पावासमुळे होऊ शकला नसला, तरी भारताने पाचव्या म्हणजेच अखेरच्या दिवशी दोन सत्र शिल्लक असतानाच विजय मिळवला. भारताने या सामन्यात सहज विजय मिळवला असला तरी फास्ट बॉलर मोहम्मद सिराजवर (Mohammad Siraj) मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात येत आहे. मोहम्मद सिराजचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे."भारताचा पहिल्या इनिंगमध्ये 327 रनवर ऑल आऊट झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा 197 रनवर ऑल आऊट झाला, ज्यामुळे भारताला 130 रनची आघाडी मिळाली. यानंतर भारताने दुसऱ्या इनिंगमध्ये 174 रन केले, अशाप्रकारे दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 305 रनचं आव्हान मिळालं. या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा 191 रनवर ऑल आऊट झाला. या विजयासह भारताने 3 टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली आहे.
मोहम्मद सिराज पाचव्या दिवशी इनिंगची 62 वी ओव्हर टाकत होता, तेव्हा टेम्बा बऊमाने मारलेला बॉल सिराजच्या हातात गेला, यानंतर सिराजने बऊमाच्या दिशेने थ्रो केला. सिराजचा हा थ्रो बऊमाच्या पायाला लागला. बॉल लागल्यामुळे बऊमादेखील त्रासात होता, यानंतर दक्षिण आफ्रिकेचा फिजियो मैदानात आला. मोहम्मद सिराजनेही या प्रकारानंतर बऊमाची माफी मागितली, तसंच जवळ जाऊन त्याची विचारपूस केली. असं असलं तरी सिराजला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.
Siraj hits Bavuma on the foot in an attempt to run him out. Team India trolling Siraj for it😂 Bumrah at the end: they can here us (in the stump mic) pic.twitter.com/APqZYz3gCT
— shitposter (@shitpostest) December 30, 2021
फिजियोने तपासल्यानंतर बऊमा पुन्हा बॅटिंग करायला लागला. तो 35 रनवर नाबाद राहिला. बऊमाने 80 बॉलचा सामना केला, ज्यात त्याने 4 फोरही मारल्या. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गारने सर्वाधिक 77 रनची खेळी केली.
मोहम्मद सिराजने या सामन्यात एकूण 3 विकेट घेतल्या. पहिल्या इनिंगमध्ये त्याला एक विकेट मिळाली, तर दुसऱ्या इनिंगमध्ये त्याने कीगन पीटरसन आणि क्विंटन डिकॉकला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. टेस्ट सीरिजची दुसरी मॅच 3 जानेवारीपासून जोहान्सबर्गमध्ये होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: South africa, Team india