सेंच्युरियन, 28 डिसेंबर : भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातली पहिली टेस्ट सेंच्युरियनमध्ये सुरू आहे. मॅचच्या तिसऱ्या दिवशी मंगळवारी भारताचा 327 रनवर ऑल आऊट झाला. यानंतर दक्षिण आफ्रिकाची अर्धी टीम पॅव्हेलियनमध्ये परतली आहे. 104 रनवर दक्षिण आफ्रिकेच्या 5 विकेट पडल्या. मॅचच्या दुसऱ्या दिवशी पावसामुळे एकही बॉल टाकला गेला नाही. पहिल्या दिवशी भारताने 3 विकेट गमावून 272 रन केले होते.
मॅचच्या तिसऱ्या दिवशी फास्ट बॉलर मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) आतापर्यंत एक विकेट घेतली आहे. सिराजने रस्सी व्हॅन डर डुसेनला 3 रनवर आऊट केलं. विकेट मिळाल्यानंतर सिराजने दिग्गज फूटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोसारखं (Cristiano Ronaldo) सेलिब्रेशन केलं. सिराजच्या सेलिब्रेशनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Indian Fast Bolwer @mdsirajofficial Does @Cristiano Celebration ! After taking a wicket!#SAvIND #INDvsSA pic.twitter.com/atdfhefoVE
— BlackThoughtt #ArmyOfThieves (@BlackthoughttZ) December 28, 2021
तिसऱ्या दिवशी भारताचा स्कोअर 278/3 एवढा झाला होता, पण पूर्ण टीम 327 रनवर ऑल आऊट झाली. म्हणजेच भारताने 49 रनवर 7 विकेट गमावल्या. केएल राहुलने (KL Rahul) सर्वाधिक 127 रनची खेळी केली. याशिवाय मयंक अग्रवालने 60 आणि अजिंक्य रहाणेने 48 रन केले. फास्ट बॉलर लुंगी एनगिडीने 71 रन देऊन 6 विकेट मिळवल्या. याशिवाय कागिसो रबाडाला 3 विकेट मिळाल्या.
Blessing your timeline with 7️⃣ 2021/22 celebrations from our no.7️⃣ #MUFC | @Cristiano pic.twitter.com/cvAAQAFvfH
— Manchester United (@ManUtd) December 19, 2021
लुंगी एनगिडीने टेस्ट क्रिकेटमध्ये दुसऱ्यांदा भारताविरुद्ध 6 विकेट मिळवल्या आहेत. याआधी त्याने 2018 साली याच मैदानात भारताच्या 6 विकेट घेतल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेकडून डेल स्टेनने सर्वाधिक 3 वेळा भारताविरुद्ध 6 विकेट घेतल्या होत्या. एनगिडीच्या नावावर आता दोन वेळा हे रेकॉर्ड झालं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.