Home /News /sport /

IND vs SA : पहिले विराटला नेटमध्ये त्रास दिला, आता थेट दक्षिण आफ्रिकेच्या टीममध्ये संधी!

IND vs SA : पहिले विराटला नेटमध्ये त्रास दिला, आता थेट दक्षिण आफ्रिकेच्या टीममध्ये संधी!

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या पहिल्या टेस्टला (India vs South Africa 1st Test) सेंच्युरियनमध्ये सुरूवात झाली आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.

    सेंच्युरियन, 26 डिसेंबर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या पहिल्या टेस्टला (India vs South Africa 1st Test) सेंच्युरियनमध्ये सुरूवात झाली आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. दक्षिण आफ्रिकेकडून मार्को जॅनसन (Marco Jansen) हा टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करत आहे. मार्कोची इथपर्यंत पोहोचण्याची कहाणीही रंजक आहे. याआधी 2018 साली झालेल्या भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात मार्कोने विराट कोहलीला नेटमध्ये बराच त्रास दिला होता. 2018 च्या सुरुवातीला विराट जोहान्सबर्ग टेस्टच्या आधी वॉंडरर्स स्टेडियमच्या नेटमध्ये बॅटिंग प्रॅक्टिस करत होता. सीरिजच्या एका इनिंगमध्ये त्याने 153 रनची खेळी केली होती, पण सरावामध्ये विराट तीन वेळा ऑफसाईडला बीट झाला. विराटला चकवा देणारा हा फास्ट बॉलर भारतीय नव्हता. 17 वर्षांच्या त्या बॉलरचं नाव होतं मार्को जेनसन (Marco Jansen). योगायोगाने मार्कोचा भाऊ डुआनही त्यावेळी मैदानात होता. या दोन्ही भावांनी विराटसोबत फोटो काढले. मार्को आणि डुआन डावखुरे फास्ट बॉलर आहेत. जेनसनचे वडील कूस रग्बी खेळाडू होते. मार्को त्याचा जुळा भाऊ डुआनपेक्षा 15 मिनिटांनी मोठा आहे. मार्को आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे. राहुल द्रविडही झाला प्रभावित टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडही मार्कोची बॉलिंग पाहून प्रभावित झाला होता. 2017 साली इंडिया ए च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर या दोन्ही भावांनी मनिष पांडे, करुण नायर आणि अभिनव मुकुंद, श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांना बॉलिंग केली होती. जेनसन बंधूंची जोडी जेव्हा भारतीय बॅट्समनना बॉलिंग करत होती, तेव्हा राहुल द्रविड (Rahul Dravid) उभा राहून या दोघांची बॉलिंग बघत होता. त्यावेळी द्रविड इंडिया ए चा प्रशिक्षक होता.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: South africa, Team india, Virat kohli

    पुढील बातम्या