मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs SA : 17 वर्ष 125 टेस्ट, गावसकरांच्या आयुष्यात कधीच आला नाही हा दिवस, राहुलचा नवा विक्रम

IND vs SA : 17 वर्ष 125 टेस्ट, गावसकरांच्या आयुष्यात कधीच आला नाही हा दिवस, राहुलचा नवा विक्रम

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडिया (India vs South Africa 1st Test) मजबूत स्थितीमध्ये पोहोचली आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा स्कोअर 272/3 एवढा आहे. केएल राहुल (KL Rahul) 122 रनवर तर अजिंक्य रहाणे 40 रनवर नाबाद आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas
मुंबई, 26 डिसेंबर : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडिया (India vs South Africa 1st Test) मजबूत स्थितीमध्ये पोहोचली आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा स्कोअर 272/3 एवढा आहे. केएल राहुल (KL Rahul) 122 रनवर तर अजिंक्य रहाणे 40 रनवर नाबाद आहे. केएल राहुलचं टेस्ट क्रिकेटमधलं हे सातवं शतक आहे. राहुलने ही शतकं चेन्नई, किंग्सटन, ओव्हल, लॉर्ड्स, सिडनी, कोलंबो आणि सेंच्युरियनमध्ये केली आहेत, म्हणजेच राहुलने केवळ एकच शतक भारतात आणि उरलेली शतकं भारताबाहेर केली आहेत. ओपनर म्हणून केएल राहुलचं हे रेकॉर्ड भारताचं सर्वोत्तम आहे. भारताच्या सगळ्यात महान खेळाडूंपैकी एक असलेल्या सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनाही दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियात शतक करता आलं नाही. सुनिल गावसकर यांनी ओपनर म्हणून इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियात शतक केलं, पण त्यावेळी दक्षिण आफ्रिकेवर क्रिकेट खेळायला बंदी होती, त्यामुळे त्यांना तिकडे एकही टेस्ट खेळता आली नाही. वीरेंद्र सेहवागने या चारही देशांमध्ये शतकं केली, पण त्याचं दक्षिण आफ्रिकेतलं एकमेव शतक मधल्या फळीत झालं होतं. 6 देशांमध्ये शतक करणारा केएल राहुल भारताचा तिसरा ओपनर आहे. याआधी सुनिल गावसकर आणि वीरेंद्र सेहवाग यांनी हा विक्रम केला आहे. केएल राहुलचं ओपनर म्हणून SENA देश म्हणजेच साऊथ आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात चौथं शतक आहे. याबाबतीत फक्त सुनिल गावसकर 8 शतकांसह त्याच्या पुढे आहेत. वीरेंद्र सेहवाग, रवी शास्त्री आणि विनू मंकड यांनी ओपनिंग करत या देशांमध्ये प्रत्येकी 3-3 शतकं केली होती.
First published:

Tags: Kl rahul

पुढील बातम्या