मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs SA : बुमराह बॉल टाकताना कोसळला, विव्हळत गेला मैदानाबाहेर, VIDEO

IND vs SA : बुमराह बॉल टाकताना कोसळला, विव्हळत गेला मैदानाबाहेर, VIDEO

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या पहिल्या टेस्टमध्ये (India vs South Africa 1st Test) जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah injured) दुखापत झाली, यानंतर तो मैदानाबाहेर गेला. बॉलिंग करत असताना बुमराहचं पाऊल पूर्णपणे वाकडं झालं.

सेंच्युरियन, 28 डिसेंबर : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये चांगल्या सुरुवातीनंतर टीम इंडियाची (India vs South Africa 1st Test) बॅटिंग गडगडली. तिसऱ्या दिवशी भारताचा स्कोअर 278/3 एवढा झाला होता, पण पूर्ण टीम 327 रनवर ऑल आऊट झाली. म्हणजेच भारताने 49 रनवर 7 विकेट गमावल्या. यानंतर भारतीय बॉलर्सनीही भेदक बॉलिंग केली. जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah Injured) अनुपस्थितीमध्येही मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांनी आफ्रिकेच्या बॅटरना चांगलाच त्रास दिला. बुमराहने दक्षिण आफ्रिकेची पहिली विकेट घेतली, पण दुखापतीमुळे त्याला मैदानातून बाहेर जावं लागलं.

इनिंगच्या 11 व्या ओव्हरमध्ये बुमराह रस्सी व्हॅन डर डुसेनला बॉल टाकत होता. तेव्हा बुमराहचं पाऊल पूर्ण वाकडं झालं, यानंतर तो मैदानातच बसून विव्हळताना दिसला. टीम इंडियाचे फिजियो यानंतर लगेचच मैदानात आले आणि त्याला घेऊन ड्रेसिंग रूममध्ये गेले. बुमराहची दुखापत सुदैवाने गंभीर नव्हती, कारण तो चहाच्या विश्रांतीनंतर पुन्हा मैदानात आला, एवढंच नाही तर त्याने दक्षिण आफ्रिकेची अखेरची विकेटही घेतली.

तिसऱ्या दिवसाच्या चहापानानंतर दक्षिण आफ्रिकेचा 197 रनवर ऑल आऊट झाला, त्यामुळे भारताला 130 रनची मोठी आघाडी मिळाली. मोहम्मद शमीला सर्वाधिक 5 विकेट, तर बुमराह-शार्दुल ठाकूरला प्रत्येकी 2-2 विकेट. मोहम्मद सिराजला एक विकेट घेण्यात यश आलं.

मॅचच्या पहिल्या दिवशी भारताने 3 विकेट गमावून 272 रन केले होते, पण दुसऱ्या दिवशी पावसामुळे खेळ होऊ शकला नाही. तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच भारताची बॅटिंग गडगडली आणि टीमचा 327 रनवर ऑल आऊट झाला. केएल राहुलने (KL Rahul) सर्वाधिक 127 रनची खेळी केली. याशिवाय मयंक अग्रवालने 60 आणि अजिंक्य रहाणेने 48 रन केले. फास्ट बॉलर लुंगी एनगिडीने 71 रन देऊन 6 विकेट मिळवल्या. याशिवाय कागिसो रबाडाला 3 विकेट मिळाल्या.

First published:
top videos

    Tags: Jasprit bumrah, South africa, Team india