Home /News /sport /

IND vs SA 1st Test : दक्षिण आफ्रिकेचा मॅच वाचवण्यासाठी संघर्ष, भारत विजयाच्या जवळ!

IND vs SA 1st Test : दक्षिण आफ्रिकेचा मॅच वाचवण्यासाठी संघर्ष, भारत विजयाच्या जवळ!

Photo-BCCI

Photo-BCCI

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टच्या चौथ्या दिवशी (India vs South Africa 1st Test) भारताची स्थिती आणखी भक्कम झाली आहे. दिवसाच्या शेवटच्या बॉलला विकेट घेऊन टीम इंडिया विजयाच्या आणखी जवळ पोहोचली आहे.

    सेंच्युरियन, 29 डिसेंबर : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टच्या चौथ्या दिवशी (India vs South Africa 1st Test) भारताची स्थिती आणखी भक्कम झाली आहे. दिवसाच्या शेवटच्या बॉलला विकेट घेऊन टीम इंडिया विजयाच्या आणखी जवळ पोहोचली आहे. दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर 94/4 असा झाला आहे. शेवटच्या दिवशी आफ्रिकेला विजयासाठी आणखी 211 रनची गरज आहे. डीन एल्गार 52 रनवर नाबाद खेळत आहे. भारताने दिलेल्या 305 रनच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवात दुसऱ्या इनिंगमध्येही खराब झाली. एडन मार्करम एक रन करूनच आऊट झाला. तर कीगन पीटरसन 17 आणि रस्सी व्हॅन डर डुसेन 11 रन करून माघारी परतला. नाईट वॉचमन म्हणून बॅटिंगला आलेला केशव महाराज आऊट झाल्यानंतर दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. भारताकडून जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) 2 तर मोहम्मद शमी (Mohammad Shami) आणि मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. त्याआधी भारताचा दुसऱ्या इनिंगमध्ये 174 रनवर ऑल आऊट झाला. पहिल्या इनिंगमध्ये मिळालेल्या 130 रनच्या आघाडीमुळे भारताने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 305 रनचं आव्हान दिलं. दुसऱ्या इनिंगमध्ये भारताकडून ऋषभ पंतने सर्वाधिक 34 रन केले. दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडा आणि मार्को जेनसनला प्रत्येकी 4-4 विकेट घेण्यात यश आलं. सेंच्युरियन टेस्टमध्ये विजय मिळवण्यासाठी आता भारताला अखेरच्या दिवशी आणखी 6 विकेटची गरज आहे, पण इथलं हवामान भारतीय टीमच्या स्वप्नावर पाणी टाकू शकतं. गुरुवारी सेंच्युरियनमध्ये पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. याआधी मॅचच्या दुसऱ्या दिवशीही पावसामुळे खेळ होऊ शकला नव्हता.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: South africa, Team india

    पुढील बातम्या