मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा 'हनुमान भक्त' खेळाडू, भारताविरुद्ध उतरला मैदानात!

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा 'हनुमान भक्त' खेळाडू, भारताविरुद्ध उतरला मैदानात!

Photo-CSA Twitter

Photo-CSA Twitter

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या पहिल्या टेस्ट मॅचला (India vs South Africa 1st Test) सुरुवात झाली आहे. फास्ट बॉलिंगला मदत करणाऱ्या सेंच्युरियनच्या खेळपट्टीवर दोन्ही टीमनी प्रत्येकी एक-एक स्पिनरला प्लेयिंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे. भारताकडून आर.अश्विन (R Ashwin) तर दक्षिण आफ्रिकेकडून केशव महाराज (Keshav Maharaj) खेळत आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas
सेंच्युरियन, 26 डिसेंबर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या पहिल्या टेस्ट मॅचला (India vs South Africa 1st Test) सुरुवात झाली आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. यानंतर मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) आणि केएल राहुल (KL Rahul) यांच्यात 117 रनची पार्टनरशीप झाली. मयंक 60 रन करून आऊट झाला, यानंतर चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) पहिल्याच बॉलला शून्य रनवर माघारी परतला. मग राहुलने विराट कोहलीसोबत (Virat Kohli) डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण विराट 35 रनवर आऊट झाला. लुंगी एनगिडीने (Lungi Ngidi) भारताच्या पहिल्या तिन्ही विकेट घेतल्या. फास्ट बॉलिंगला मदत करणाऱ्या सेंच्युरियनच्या खेळपट्टीवर दोन्ही टीमनी प्रत्येकी एक-एक स्पिनरला प्लेयिंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे. भारताकडून आर.अश्विन (R Ashwin) तर दक्षिण आफ्रिकेकडून केशव महाराज (Keshav Maharaj) खेळत आहे. केशव महाराज भारतीय मूळ असलेला दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू आहे. केशव महाराजचे पूर्वज भारत सोडून दक्षिण आफ्रिकेत गेले होते, पण तरीही त्यांनी हिंदू संस्कृतीशी आपली नाळ जोडून ठेवली. केशव महाराज आजही हनुमान भक्त आहे. पूजा करण्यासाठी तो हनुमानाच्या मंदिरातही जातो.
हनुमान मंदिराचे अनेक फोटो त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. केशव महाराजने 37 टेस्टमध्ये 32.61 च्या सरासरीने 129 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय त्याने 15 वनडेमध्ये 19 विकेट आणि 8 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 6 विकेट मिळवल्या आहेत.
First published:

Tags: South africa, Team india

पुढील बातम्या