IND vs SA 1st Test : दिवसाच्या शेवटच्या बॉलला दक्षिण आफ्रिकेला धक्का, भारताला विजयासाठी 6 विकेटची गरज

भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa 1st Test) यांच्यातल्या पहिल्या टेस्टच्या चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. दिवसाची सुरुवात भारताने 16/1 अशी केली आहे. पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडियाला 130 रनची मोठी आघाडी मिळाली.

 • News18 Lokmat
 • | December 29, 2021, 21:40 IST |
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  21:34 (IST)

  दक्षिण आफ्रिकेला चौथा धक्का, नाईट वॉचमन केशव महाराजला बुमराहने केलं बोल्ड, दिवसाचा खेळ संपला, दक्षिण आफ्रिका 94/4,  अखेरच्या दिवशी विजयासाठी आणखी 211 रनची गरज

  21:11 (IST)

  दक्षिण आफ्रिकेला तिसरा धक्का, बुमराहने रस्सी व्हॅन डर डुसेनला केलं बोल्ड, दक्षिण आफ्रिका 74/3, अजूनही विजयासाठी 231 रनची गरज

  19:29 (IST)

  दक्षिण आफ्रिकेला दुसरा धक्का, कीगन पीटरसन 17 रनवर आऊट, मोहम्मद सिराजला मिळाली विकेट, दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर 34/2, अजूनही विजयासाठी 271 रनची गरज

  18:16 (IST)

  दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का, एडन मार्करम 1 रनवर आऊट, मोहम्मद शमीला मिळाली विकेट, दक्षिण आफ्रिका 1/1

  17:50 (IST)

  भारताचा 174 रनवर ऑल आऊट, दक्षिण आफ्रिकेला विजयसाठी 305 रनची गरज. ऋषभ पंतने केल्या सर्वाधिक 34 रन. कागिसो रबाडा आणि मार्को जेनसननी घेतल्या प्रत्येकी 4-4 विकेट. लुंगी एनगिडीला मिळाल्या 2 विकेट

  17:45 (IST)

  भारताला नववा धक्का, मोहम्मद शमी 1 रनवर आऊट, रबाडाला मिळाली चौथी विकेट, भारत 169/9, आघाडी झाली 299 रन

  17:38 (IST)

  भारताला आठवा धक्का, ऋषभ पंत 34 रनवर आऊट, रबाडाला मिळाली विकेट. भारताचा स्कोअर 166/8, आघाडी पोहोचली 296 रनवर

  17:21 (IST)

  भारताला 7 वा धक्का, आर.अश्विन 14 रनवर आऊट, भारताचा स्कोअर 146/7, आघाडी 276 रन

  16:46 (IST)

  भारताला सहावा धक्का, अजिंक्य रहाणे 20 रनवर आऊट, मार्को जेनसनला मिळाली आणखी एक विकेट. भारताचा स्कोअर 111/6. आघाडी 241 रन

  16:37 (IST)

  भारताला पाचवा धक्का, चेतेश्वर पुजारा 16 रनवर आऊट, भारताचा स्कोअर 109/5. लुंगी एनगिडीने घेतली विकेट, आघाडी पोहोचली 239 रनवर

  सेंच्युरियन, 29 डिसेंबर : भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa 1st Test) यांच्यातल्या पहिल्या टेस्टच्या चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. दिवसाची सुरुवात भारताने 16/1 अशी केली आहे. पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडियाला 130 रनची मोठी आघाडी मिळाली. टेस्टच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे होऊ शकला नाही, तसंच उरलेले दोन दिवसही पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे, त्यामुळे या टेस्ट मॅचचा निकाल लागण्यासाठी दोन्ही टीमना चमत्कारच करावा लागण्याची शक्यता आहे.

  मॅचच्या तिसऱ्या दिवशी तब्बल 18 विकेट गेल्या. दिवसाअखेरीस केएल राहुल 4 रनवर तर नाईट वॉचमन म्हणून बॅटिंगला आलेला शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) 4 रनवर खेळत होते. मयंक अग्रवाल 4 रनवर आऊट झाला, त्याला मार्को जेनसनने माघारी पाठवलं. त्याआधी भारताने दक्षिण आफ्रिकेचा 197 रनवरच ऑल आऊट केला, त्यामुळे टीम इंडियाला 130 रनची मोठी आघाडी मिळाली.

  भारताकडून मोहम्मद शमीने (Mohammad Shami) सर्वाधिक 5 विकेट घेतल्या, तर जसप्रीत बुमराह आणि शार्दुल ठाकूर यांना प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या. मोहम्मद सिराजला एक विकेट घेण्यात यश आलं. दक्षिण आफ्रिकेकडून टेम्बा बऊमाने सर्वाधिक 52 रन केल्या, तर क्विंटन डिकॉक 34 रन करून आऊट झाला.

  तिसऱ्या दिवसाची सुरुवात भारताने 272/3 अशी केली होती, पण 278 रनवर भारताला केएल राहुलच्या रुपात चौथा धक्का लागला, यानंतर भारताची बॅटिंग गडगडली. 49 रनमध्येच भारताने शेवटच्या 7 विकेट गमावल्या. केएल राहुलने (KL Rahul) सर्वाधिक 127 रनची खेळी केली. याशिवाय मयंक अग्रवालने 60 आणि अजिंक्य रहाणेने 48 रन केले. फास्ट बॉलर लुंगी एनगिडीने 71 रन देऊन 6 विकेट मिळवल्या.