IND vs SA 1st Test Day 3 Live : शमीच्या भेदक बॉलिंगमुळे आफ्रिका ऑलआऊट, भारताला मोठी आघाडी

भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa 1st Test) यांच्यातल्या पहिल्या टेस्टच्या दुसरा दिवसाचा खेळ पावसामुळे होऊ शकला नाही. पावसामुळे खेळ रद्द दक्षिण आफ्रिकेच्या पथ्यावर पडलं, कारण पहिल्या दिवशी टीम इंडिया मजबूत स्थितीमध्ये पोहोचली होती.

  • News18 Lokmat
  • | December 28, 2021, 21:02 IST |
    LAST UPDATED A YEAR AGO

    हाइलाइट्स

    22:2 (IST)

    तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, भारताचा स्कोअर 16/1. टीम इंडियाला 146 रनची आघाडी. केएल राहुल 5 रनवर तर शार्दुल ठाकूर 4 रनवर नाबाद. मयंक अग्रवाल 4 रनवर आऊट. मार्को जेनसनने घेतली विकेट

    20:55 (IST)

    दक्षिण आफ्रिकेचा 197 रनवर ऑल आऊट, जसप्रीत बुमराहने घेतली अखेरची विकेट. भारताला 130 रनची आघाडी. मोहम्मद शमीला सर्वाधिक 5 विकेट, तर बुमराह-शार्दुल ठाकूरला प्रत्येकी 2-2 विकेट. मोहम्मद सिराजला एक विकेट घेण्यात यश

    20:50 (IST)

    दक्षिण आफ्रिकेला 9 वा धक्का, कागिसो रबाडा 25 रनवर आऊट, मोहम्मद शमीला 5 वी विकेट. दक्षिण आफ्रिका 193/9

    20:26 (IST)

    दक्षिण आफ्रिकेला आठवा धक्का, मार्को जेनसन 19 रन करून आऊट, शार्दुल ठाकूरने घेतली विकेट. दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर 181/8

    19:40 (IST)

    अर्धशतकानंतर टेम्बा बऊमा आऊट, मोहम्मद शमीने घेतली चौथी विकेट, दक्षिण आफ्रिका 144/7

    19:29 (IST)

    दक्षिण आफ्रिकेला सहावा धक्का, मुडलर 12 रनवर आऊट, मोहम्मद शमीला मिळाली विकेट, आफ्रिकेचा स्कोअर 134/6, अजूनही 192 रननी पिछाडीवर

    18:44 (IST)

    तिसऱ्या दिवसाच्या चहापानापर्यंत दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर 109/5, आफ्रिका अजूनही 218 रनने पिछाडीवर, मोहम्मद शमीला 2 विकेट तर जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूरला प्रत्येकी 1-1 विकेट

    18:26 (IST)

    दक्षिण आफ्रिकेला पाचवा धक्का, क्विंटन डिकॉक 34 रनवर आऊट, शार्दुल ठाकूरला मिळाली विकेट, दक्षिण आफ्रिका 104/5, अजूनही 223 रनने पिछाडीवर

    16:47 (IST)

    दक्षिण आफ्रिकेला चौथा धक्का, रस्सी व्हॅन डर डुसेन 3 रनवर आऊट, मोहम्मद सिराजला मिळाली विकेट, दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर 32/4

    16:41 (IST)

    भारताला मोठा धक्का, बॉलिंग करत असताना जसप्रीत बुमराहच्या पायाला दुखापत, दुखापतीमुळे बुमराह मैदानाबाहेर

    सेंच्युरियन, 28 डिसेंबर : भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa 1st Test) यांच्यातल्या पहिल्या टेस्टच्या दुसरा दिवसाचा खेळ पावसामुळे होऊ शकला नाही. पावसामुळे खेळ रद्द दक्षिण आफ्रिकेच्या पथ्यावर पडलं, कारण पहिल्या दिवशी टीम इंडिया मजबूत स्थितीमध्ये पोहोचली होती. आता मॅचचा निकाल आपल्या बाजूने लावण्यासाठी टीम इंडियाला चमत्कार करावा लागणार आहे. दुसऱ्या दिवशी पावसाने खेळ केला असला तरी तिसऱ्या दिवशी मात्र संपूर्ण खेळ व्हायची शक्यता आहे, कारण हवामान खात्याने पाऊस पडणार नाही असा अंदाज वर्तवला आहे. दुसरा दिवस पावसाने फुकट गेला असल्यामुळे आता उरलेले तिन्ही दिवस 98 ओव्हरचा खेळ होणार आहे.

    या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, यानंतर भारताने दिवसाअखेर 272/3 एवढा स्कोअर केला. केएल राहुल (KL Rahul) 122 रनवर तर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) 40 रनवर नाबाद खेळत आहेत. केएल राहुल आणि मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) या दोन्ही ओपनरनी भारताला 117 रनची सुरूवात करून दिली, पण मयंक 60 रनवर आऊट झाला. यानंतर लगेचच पुढच्याच बॉलला चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) शून्य रनवर माघारी परतला. लागोपाठ दोन विकेट गेल्यानंतर राहुल आणि विराटने भारताचा डाव सावरायला सुरुवात केली. पण ऑफ स्टम्पच्या बाहेरचा बॉल मारण्याच्या नादात विराट 35 रनवर आऊट झाला. विराटची विकेट गेल्यानंतर राहुलने पुन्हा एकदा अजिंक्य रहाणेसोबत पार्टनरशीप केली. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडीने (Lungi Ngidi) सगळ्या 3 विकेट घेतल्या.