मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs SA 1st Test : दुसरा दिवस पावसामुळे रद्द, असं असणार बाकीच्या दिवसांचं हवामान

IND vs SA 1st Test : दुसरा दिवस पावसामुळे रद्द, असं असणार बाकीच्या दिवसांचं हवामान

भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa)यांच्यातल्या पहिल्या टेस्टचा दुसरा दिवस पावसामुळे (Centurion Weather) रद्द करण्यात आला आहे. सकाळपासूनच जोरदार पाऊस पडत असल्यामुळे अंपायर आणि मॅच अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला.

सेंच्युरियन, 27 डिसेंबर : भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa)यांच्यातल्या पहिल्या टेस्टचा दुसरा दिवस पावसामुळे (Centurion Weather) रद्द करण्यात आला आहे. सकाळपासूनच जोरदार पाऊस पडत असल्यामुळे अंपायर आणि मॅच अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला. संपूर्ण दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द झाल्यानंतर आता उरलेले तिन्ही दिवस 98 ओव्हरचा खेळ होणार आहे. या टेस्टच्या पहिल्या दिवशीही पावसाचा अंदाज होता, पण पहिल्या दिवशी पूर्ण 90 ओव्हरचा खेळ झाला. दुसऱ्या दिवशी मात्र हवामान बदललं आणि मैदानावर काळे ढग दाटून आले.

दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू व्हायच्या आधी जवळपास 20 मिनिटं पाऊस थांबला होता, यानंतर मैदानातल्या कर्मचाऱ्यांनी कव्हरही काढली, पण पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार तिसऱ्या दिवशी उन्ह असेल, पण चौथ्या आणि पाचव्या दिवशी पावसामुळे खेळ प्रभावित होऊ शकतो. चौथ्या दिवशी काळे ढग असतील, तसंच दुपारी वादळाचाही अंदाज आहे. तर पाचव्या दिवशी हवामान आणखी खराब असण्याची शक्यता आहे. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला, तर मात्र या टेस्ट मॅचचा निकाल लागणं कठीण होणार आहे.

पहिल्या दिवशी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, यानंतर भारताने 3 विकेट गमावून 272 रन केले. केएल राहुल (KL Rahul) 122 रनवर तर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) 40 रनवर नाबाद आहेत. मयंक अग्रवाल 60 रन करून आणि विराट कोहली (Virat Kohli) 35 रन करून आऊट झाले. चेतेश्वर पुजारा पहिल्याच बॉलला शून्य रनवर माघारी परतला. भारताच्या तिन्ही विकेट लुंगी एनगिडीने घेतल्या.

First published:
top videos

    Tags: South africa, Team india