मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs SA : पुजारा 0 चा टॉपर! 'गुरू'चं लाजिरवाणं रेकॉर्डही मोडलं

IND vs SA : पुजारा 0 चा टॉपर! 'गुरू'चं लाजिरवाणं रेकॉर्डही मोडलं

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाची (India vs South Africa 1st Test) सुरुवात चांगली झाली आहे. विराट कोहलीने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतल्यानंतर भारताचा स्कोअर 250 च्या पार गेला आहे. तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला आलेला चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) अपयशी ठरला.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

सेंच्युरियन, 26 डिसेंबर : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाची (India vs South Africa 1st Test) सुरुवात चांगली झाली आहे. विराट कोहलीने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतल्यानंतर भारताचा स्कोअर 250 च्या पार गेला आहे. केएल राहुलने (KL Rahul) झुंजार शतक केलं, तर मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) 60 रन करून आऊट झाला. भारतासाठी ही सीरिज महत्त्वाची आहे, कारण भारताला कधीच दक्षिण आफ्रिकेत टेस्ट सीरिज जिंकता आलेली नाही. टीमचा कोच राहुल द्रविडलाही (Rahul Dravid) चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.

केएल राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी पहिल्या विकेटसाठी शतकीय पार्टनरशीप केली. पण तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला आलेला चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) अपयशी ठरला. पहिल्याच बॉलला पुजारा शून्य रनवर आऊट झाला. लुंगी एनगिडीने पुजाराला माघारी पाठवलं. पुजारा टेस्ट क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक 9 वेळा शून्यवर आऊट होणारा भारतीय बनला आहे. त्याने तिसऱ्या क्रमांकावर 17 शतकं आणि 29 अर्धशतकं केली आहेत. मागच्या दोन वर्षांमध्ये पुजाराची टेस्ट क्रिकेटमधली कामगिरी निराशाजनक झाली आहे, त्यामुळे त्याच्यासाठी ही सीरिज महत्त्वाची आहे. योगायोग म्हणजे याआधी 2018 सालीही सेंच्युरियनच्या मैदानातच पुजारा पहिल्याच बॉलला शून्य रनवर आऊट झाला होता. त्यावेळी लुंगी एनगिडीने पुजाराला रन आऊट केलं होतं, तर यंदाही एनगिडीनेच पुजाराची विकेट घेतली.

वेंगसरकर दुसऱ्या द्रविड तिसऱ्या क्रमांकावर

टेस्ट क्रिकेटमध्ये तिसरा क्रमांक अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पुजाराशिवाय वेंगसरकर टेस्टमध्ये 8 वेळा आणि द्रविड 7 वेळा तिसऱ्या क्रमांकावर शून्य रनवर आऊट झाले आहेत. अजित वाडेकर टेस्टमध्ये 5 वेळा शून्य रनवर माघारी परतले. तिसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक शतकं करणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये द्रविडचं नाव आहे. द्रविडने 28 शतकांच्या मदतीने 10 हजारांपेक्षा जास्त रन केले आहेत.

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) या सामन्यात चांगल्या सुरुवातीनंतर 35 रनवर आऊट झाला. मागच्या दोन वर्षांपासून चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीला शतक करता आलेलं नाही.

First published:

Tags: Pujara, South africa, Team india