मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs SA : भारताने जिंकला सेंच्युरियनचा गड, कोहली-रहाणे नाही, हे 5 जण 'विराट' विजयाचे हिरो!

IND vs SA : भारताने जिंकला सेंच्युरियनचा गड, कोहली-रहाणे नाही, हे 5 जण 'विराट' विजयाचे हिरो!

भारतीय टीमने दक्षिण आफ्रिका दौऱ्यातली पहिली टेस्ट (India vs South Africa 1st Test) जिंकली आहे. सेंच्युरियनमध्ये झालेल्या या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 113 रननी पराभव केला.

भारतीय टीमने दक्षिण आफ्रिका दौऱ्यातली पहिली टेस्ट (India vs South Africa 1st Test) जिंकली आहे. सेंच्युरियनमध्ये झालेल्या या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 113 रननी पराभव केला.

भारतीय टीमने दक्षिण आफ्रिका दौऱ्यातली पहिली टेस्ट (India vs South Africa 1st Test) जिंकली आहे. सेंच्युरियनमध्ये झालेल्या या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 113 रननी पराभव केला.

मुंबई, 30 डिसेंबर : भारतीय टीमने दक्षिण आफ्रिका दौऱ्यातली पहिली टेस्ट (India vs South Africa 1st Test) जिंकली आहे. सेंच्युरियनमध्ये झालेल्या या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 113 रननी पराभव केला. भारतीय टीम या मैदानात पहिल्यांदाच टेस्ट मॅच जिंकण्यात यशस्वी ठरली. तसंच सेंच्युरियनमध्ये टेस्ट जिंकणारी टीम इंडिया पहिली आशियाई टीमही बनली आहे. दक्षिण आफ्रिका या मैदानात 2014 नंतर पहिल्यांदाच टेस्ट मॅच हरली आहे. भारताच्या या विजयाचे 5 हिरो ठरले.

राहुलचं सातवं शतक

केएल राहुलने (KL Rahul) या मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये 123 रनची शानदार खेळी केली. या मॅचमध्ये शतक करणारा तो एकमेव बॅटर आहे. केएल राहुलचं टेस्ट करियरमधलं हे सातवं शतक आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये त्याने 23 रन केले.

मयंकने दिली साथ

केएल राहुलप्रमाणेच भारताचा दुसरा ओपनर मयंक अग्रवालनेही (Mayank Agarwal) चांगली बॅटिंग केली, पहिल्या इनिंगमध्ये त्याने 60 रन केले. मयंक आणि राहुल यांच्यात पहिल्या इनिंगमध्ये 127 रनची ओपनिंग पार्टनरशीप झाली. या दोघांच्या पार्टनरशीपमुळे भारताच्या विजयाचा पाया रचला गेला.

मोहम्मद शमीचा पंच

मोहम्मद शमीने (Mohammad Shami) या सामन्यात 8 विकेट घेतल्या, यातल्या 5 विकेट पहिल्या इनिंगमधल्या होत्या. मोहम्मद शमीच्या भेदक बॉलिंगमुळे भारताने दक्षिण आफ्रिकेला पहिल्या इनिंगमध्ये 197 रनवर रोखलं. शमीने दुसऱ्या इनिंगमध्ये 3 विकेट घेतल्या.

बुमराहची आक्रमक बॉलिंग

मोहम्मद शमीप्रमाणेच जसप्रीत बुमराहनेही (Jasprit Bumrah) या सामन्यात आक्रमक बॉलिंग केली आणि भारताला मोक्याच्या क्षणी विकेट काढून दिल्या. बुमराहला या सामन्यात 5 विकेट मिळाल्या, यातल्या 2 पहिल्या इनिंगमध्ये आणि 3 दुसऱ्या इनिंगमध्ये होत्या.

ऋषभ पंतचे 7 बळी

विकेट कीपर ऋषभ पंतनेही (Rishabh Pant) या सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केली. या मॅचमध्ये त्याने एकूण 7 कॅच पकडले, याशिवाय त्याने दुसऱ्या इनिंगमध्ये 34 रनची महत्त्वाची खेळी केली.

First published:
top videos

    Tags: South africa, Team india, Virat kohli