विराटनं ड्रेसिंगरूममधून जडेजाला केला इशारा, VIDEO VIRAL

विराटनं ड्रेसिंगरूममधून जडेजाला केला इशारा, VIDEO VIRAL

भारताचे 6 गडी बाद झाल्यानंतर विराटने ड्रेसिंगरूममधून हातवारे करत जडेजाला इशारा केला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • Share this:

विशाखापट्टणम, 03 ऑक्टोंबर : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारातने पहिला डाव 502 धावांवर घोषित केला. भारताचे सलामीवीर रोहित शर्माचे शतक आणि मयंक अग्रवालच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने धावांचा डोंगर उभा केला. रोहित शर्मा आणि मयंक अग्रवाल बाद झाल्यानंतर धावांची गती कमी झाली. अखेर 7 बाद 502 धावांवर भारतानं डाव घोषित केला.

दरम्यान, पहिला डाव घोषित करण्यापूर्वी सहा गडी बाद झाल्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीनं मैदानावर रविंद्र जडेजाला केलेला इशारा चर्चेचा विषय झाला आहे. हनुमा विहारी बाद झाल्यानंतर विराह कोहलीनं ड्रेसिंगरूममधून जडेजाला इशारा दिला. भारताच्या डावातील 128 व्या षटकातील दुसऱ्या चेंडूपूर्वी विराटने ड्रेसिंगरूममधून हाताच्या बोटांनी 9 नंबरचा इशारा केला.

विराटने जडेजाकडे पाहून हातवारे केले त्यावेळी भारताची अवस्था 6 बाद 458 अशी झाली होती. विराटनं जडेजाला इशारा करून सांगितलं की, अजुन 9 षटके खेळायची असून धावांचा वेग वाढवायला पाहिजे. त्यावर जडेजानेदेखील प्रतिसाद दिला. त्यानंतर रविंद्र जडेजा आणि ऋद्धिमान साहा यांनी धावांचा वेग वाढवला. या नादात साहा 16 चेंडूत 21 धावांवर बाद झाला.

विराटच्या या इशाऱ्याचा व्हिडिओ टीम इंडियाच्या इन्स्टाग्रामवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर कॅप्शन देताना तुम्हाला यांच्या इशाऱ्याचा अर्थ सांगता येतोय का बघा? असंही विचारलं आहे.

तत्पूर्वी, पहिल्या दिवसाच्या बिनबाद 202 धावसंख्येवरून पुढे खेळताना रोहित शर्मा 176 धावांवर बाद झाला तर मयंक अग्रवाल 215 धावा करून बाद झाला. कसोटीपटू चेतेश्वर पुजारा अवघ्या 6 धावांवर तंबूत परतला. विराट कोहली 20 तर केएल राहुल 15 धावा करू शकले. हनुमा विहारीला 10 धावा करता आल्या. शेवटी रविंद्र जडेजा आणि ऋद्धिमान साहाने संघाला 500 धावांचा टप्पा पार करून दिला. जडेजाने नाबाद 30 धावांची खेळी केली.

VIDEO: 'राज्यातून जातीयवादी पक्षांची सत्ता हद्दपार करणार', पृथ्वीराज चव्हाणांचा निर्धार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 3, 2019 05:36 PM IST

ताज्या बातम्या