भारताचा 'डॉन', रोहितनं केली ब्रॅडमन यांच्या विश्वविक्रमाशी बरोबरी

भारताचा 'डॉन', रोहितनं केली ब्रॅडमन यांच्या विश्वविक्रमाशी बरोबरी

भारताचा हिटमॅन रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत सलामीला उतरताना दीडशतकी खेळी करून आपण या प्रकारातही फीट बसत असल्याचा दावा भक्कम केला आहे.

  • Share this:

विशाखापट्टणम, 03 ऑक्टोबर : भारताचा हिटमॅन रोहित शर्माने टी20, एकदिवसीय क्रिकेटपाठोपाठ आता आपण कसोटीतही फिट असल्याचा दावा भक्कम केला आहे. त्यानं सलामीवीर म्हणून पहिली कसोटी खेळताना जबरदस्त खेळी केली. रोहित शर्माने चौथं कसोटी शतक फक्त 154 चेंडूत साजरं केलं. यामध्ये त्यानं 4 षटकार आणि 10 चौकार मारले. रोहित शर्माने त्याच्यावर टीका करणाऱ्यांना बॅटने उत्तर दिलं. कसोटीच्या दुसऱ्या दिवशी रोहित शर्मा 176 धावांवर बाद झाला. यासह त्यानं महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाची बरोबरी केली.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात शतक करताच रोहित शर्माची भारतीय मैदानावरील सरासरी 98.22 इतकी झाली. यासह त्याने ब्रॅडमन यांच्याशी बरोबरी केली . कसोटीमध्ये डॉन ब्रॅडमन यांची सरासरी 99.9 इतकी आहे. त्यांनी घरच्या मैदानावर 98.22 इतक्या सरासरीने धावा केल्या होत्या. आता रोहित शर्मानेही त्यांची बरोबरी केली आहे. रोहित शर्माने भारतात 10 कसोटीत 98.22 च्या सरासरीने 884 धावा केल्या आहेत. यामध्ये 4 शतके आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे.

रोहित शर्मा हा भारताकडून क्रिकेटच्या तीनही प्रकारात शतक साजरं करणारा पहिला सलामीवीर ठरला आहे. तर सलामीवीर म्हणून खेळताना पहिल्याच सामन्यात शतक करणारा तो चौथा खेळाडू ठरला आहे. त्याच्याआधी शिखर धवन, केएल राहुल, पृथ्वी शॉ यांनी अशी कामगिरी केली आहे.

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये शतक करणारा रोहित शर्मा भारताचा पहिला सलामीवीर ठरला आहे. रोहितने कसोटी पदार्पणातही शतक साजरं केलं होतं. याशिवाय गेल्या दहा वर्षांत शतक साजरं करताना चार षटकार मारणारा रोहित शर्मा भारताचा पहिलाच सलामीवीर ठरला आहे.

भारताचा सलामीवीर रोहित शर्माने मयंक अग्रवालसोबत शतकी भागिदारी केली. भारताच्या सलामीवीरांनी तब्बल 24 डावांनंतर कसोटीत शतकी भागिदारी केली आहे. याआधी 2018 मध्ये मुरली विजय आणि शिखर धवन यांनी अफगाणिस्तानविरुद्ध शतकी भागिदारी केली होती.

VIDEO: वरळी मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध होणार? उद्धव ठाकरे म्हणतात...

Published by: Suraj Yadav
First published: October 3, 2019, 3:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading