Home /News /sport /

IND vs SA T20 : टीम इंडिया वर्ल्ड रेकॉर्डच्या उंबरठ्यावर, राहुल या Playing XI सोबत मैदानात उतरणार!

IND vs SA T20 : टीम इंडिया वर्ल्ड रेकॉर्डच्या उंबरठ्यावर, राहुल या Playing XI सोबत मैदानात उतरणार!

भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa T20 Series) यांच्यातल्या 5 टी-20 मॅचच्या सीरिजला गुरूवारपासून सुरूवात होत आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह या सीनियर खेळाडूंना सीरिजमधून विश्रांती देण्यात आली आहे.

    नवी दिल्ली, 8 जून : भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa T20 Series) यांच्यातल्या 5 टी-20 मॅचच्या सीरिजला गुरूवारपासून सुरूवात होत आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह या सीनियर खेळाडूंना सीरिजमधून विश्रांती देण्यात आली आहे. या खेळाडूंऐवजी आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्यांना संधी देण्यात आली आहे. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) यांचं टीममध्ये पुनरागमन झालं आहे, तर उमरान मलिक (Umran Malik) आणि अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) यांची पहिल्यांदाच भारतीय टीममध्ये निवड झाली आहे. रोहित शर्माच्या गैरहजेरीत केएल राहुलकडे (KL Rahul) टीमचं नेतृत्व देण्यात आलं आहे. दिल्लीमध्ये होत असलेल्या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी आहे. हा सामना भारताने जिंकला तर टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये लागोपाठ 13 विजय मिळवण्याचा विक्रम टीम इंडियाच्या नावावर होईल. सध्या भारताने अफगाणिस्तानच्या लागोपाठ 12 विजयाची बरोबरी केली आहे. विराट कोहली कर्णधार असताना टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताच्या विजयाची मालिका सुरू झाली, यानंतर रोहितच्या नेतृत्वात भारताने न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेचा लागोपाठ 9 सामन्यांमध्ये पराभव केला. राहुल कोणाला देणार संधी? लेफ्टी-राईटी कॉम्बिनेशनमुळे केएल राहुलसोबत ओपनिंगला इशान किशन यायची शक्यता आहे. तसंच ऋतुराज गायकवाडचा पर्यायही टीमपुढे आहे. विराटच्या गैरहजेरीत श्रेयस अय्यर तिसऱ्या क्रमांकावर खेळेल, हे जवळपास निश्चित आहे. यानंतर चौथ्या क्रमांकावर ऋषभ पंत आणि पाचव्या, सहाव्या क्रमांकावर दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या फिनिशरची भूमिका बजावतील. आणखी एक ऑलराऊंडर खेळवण्याचा निर्णय घेतला तर सातव्या क्रमांकासाठी व्यंकटेश अय्यर आणि अक्षर पटेल यांच्यापैकी एक पर्याय उपलब्ध आहे. बॉलर्समध्ये अनुभवाची कमी बॉलर्समध्ये अनुभवी भुवनेश्वर कुमारसोबत हर्षल पटेल, युझवेंद्र चहल या दोघांची नाव निश्चित मानली जात आहेत, पण फास्ट बॉलरपैकी आवेश खान, उमरान मलिक, अर्शदीप यांच्यापैकी एकाला खेळवायचं का स्पिनर असलेल्या कुलदीप यादवला संधी द्यायची? हा निर्णय केएल राहुलसाठी डोकेदुखी ठरू शकतो. भारताची संभाव्य टीम केएल राहुल, इशान किशन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, युझवेंद्र चहल, आवेश खान/कुलदीप यादव
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: South africa, Team india

    पुढील बातम्या