Home /News /sport /

IND vs SA : क्रिकेटच्या देवासमोर कार्तिकने केलं होतं 'पाप', आता 13 वर्षांनी मिळाली शिक्षा!

IND vs SA : क्रिकेटच्या देवासमोर कार्तिकने केलं होतं 'पाप', आता 13 वर्षांनी मिळाली शिक्षा!

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यामध्ये टीम इंडियाचा (India vs South Africa 1st T20) 7 विकेटने पराभव झाला. या सामन्यात हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) दिनेश कार्तिकचा (Dinesh Karthik) अपमान केल्याचा आरोप चाहते करत आहेत, पण 13 वर्षांपूर्वी सचिन तेंडुलकरसोबतही (Sachin Tendulkar) अशीच घटना घडली होती, तेव्हा व्हिलन होता दिनेश कार्तिक.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 10 जून : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यामध्ये टीम इंडियाचा (India vs South Africa 1st T20) 7 विकेटने पराभव झाला आहे. 212 रनचं आव्हान रोखणंही टीम इंडियाच्या बॉलर्सना शक्य झालं नाही. या सामन्यात पहिले बॅटिंग करणाऱ्या भारताने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 211 रन केले. या सामन्यात टीम इंडियाच्या बॉलरनी केलेल्या कामगिरीसोबतच हार्दिक पांड्यावरही (Hardik Pandya) टीका करण्यात येत आहे. हार्दिक पांड्याने 12 बॉलमध्ये नाबाद 31 रनची आक्रमक खेळी केली, पण तरीही त्याने मैदानात केलेल्या कृत्यामुळे चाहते चांगलेच संतापले. हार्दिक पांड्याने 20 व्या ओव्हरमध्ये एनरिच नॉर्कियाचा पाचव्या बॉल मिड विकेटच्या दिशेने मारला. एक रन काढणं शक्य होतं तरीही हार्दिकने दिनेश कार्तिकऐवजी (Dinesh Karthik) स्वत:कडे स्ट्राईक ठेवला. यानंतर अखेरच्या बॉलला हार्दिकने दोन रन काढले. हार्दिक पांड्याने दिनेश कार्तिकचा अपमान केला आहे. त्याला स्ट्राईक न द्यायला तो काही 10 व्या आणि 11व्या क्रमांकाचा बॅट्समन नाही, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत. इतिहासाची पुनरावृत्ती गुरूवारी झालेल्या या सामन्यात घडलेली ही घटना म्हणजे इतिहासाची पुनरावृत्तीच म्हणावी लागेल. 13 वर्षांपूर्वी 21 डिसेंबर 2009 साली सचिन तेंडुलकरसोबतही (Sachin Tendulkar) असंच काहीसं घडलं होतं आणि तेव्हा व्हिलन ठरला होता दिनेश कार्तिक. कटकच्या बाराबती स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात श्रीलंकेचा 44.2 ओव्हरमध्ये 239 रनवर ऑल आऊट झाला. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या सचिन तेंडुलकरने श्रीलंकेच्या बॉलिंगवर आक्रमण केलं. एमएस धोनी त्या सीरिजमध्ये खेळत नसल्यामुळे दिनेश कार्तिकला टीम इंडियात संधी देण्यात आली होती. टीम इंडिया आव्हानाच्या जवळ येत होती तेव्हा सचिनही शतकाजवळ आला होता. भारताला विजयासाठी आणि सचिनला शतकासाठी एक अंकी धावसंख्येची गरज होती, त्यामुळे कार्तिक सचिनला स्ट्राईक देईल, असं वाटत होतं, पण दिनेश कार्तिकने श्रीलंकन स्पिनरला सिक्स मारली आणि सचिनचं शतक करणं कठीण झालं. यानंतर 43 व्या ओव्हरमध्ये मलिंगाने टाकलेला बॉल कार्तिकच्या पायाला लागून बाऊंड्रीच्या दिशेने गेला आणि भारताला लेग बाईजच्या 4 रन मिळाल्या, ज्यामुळे टीमचा विजय झाला. श्रीलंकेविरुद्धच्या त्या सामन्यात सचिन तेंडुलकर 96 रनवर नॉट आऊट राहिला. दिनेश कार्तिकने जर सचिनला स्ट्राईक दिला असता तर सचिनला त्याचं शतक पूर्ण करणं सोपं गेलं असतं.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Hardik pandya, Sachin tendulkar, South africa, Team india

    पुढील बातम्या