• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IND vs SA 1st ODI : तीन भारतीयांची अर्धशतकं व्यर्थ, दक्षिण आफ्रिकेचा 31 रननी विजय

IND vs SA 1st ODI : तीन भारतीयांची अर्धशतकं व्यर्थ, दक्षिण आफ्रिकेचा 31 रननी विजय

टेस्ट सीरिजमधल्या पराभवाचा बदला वनडे सीरिजमध्ये (India vs South Africa 1st ODI) घेण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरत आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.

 • News18 Lokmat
 • | January 19, 2022, 22:20 IST
  LAST UPDATED 4 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  22:19 (IST)

  पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाचा 31 रननी पराभव, धवन, विराट आणि शार्दुल ठाकूरची अर्धशतकं व्यर्थ, 50 ओव्हरमध्ये भारताचा स्कोअर 265/8, लुंगी एनगिडी, तबरेझ शम्सी, एनडिले पेहक्लुक्वायो यांना प्रत्येकी 2-2 विकेट, मार्करम आणि महाराजला 1-1 विकेट घेण्यात यश

  21:29 (IST)

  भारताला आठवा धक्का, भुवनेश्वर कुमार 4 रनवर आऊट, भारताचा स्कोअर 214/8, विजयासाठी 45 बॉलमध्ये 83 रनची गरज

  21:11 (IST)

  भारताला सातवा धक्का, अश्विन 7 रनवर आऊट, भारताचा स्कोअर 199/7, विजयासाठी 68 बॉलमध्ये 98 रनची गरज

  20:56 (IST)

  भारताला सहावा धक्का, व्यंकटेश अय्यर 2 रनवर आऊट, भारताचा स्कोअर 188/6, विजयासाठी 85 बॉलमध्ये 109 रनची गरज

  20:47 (IST)

  भारताला पाचवा धक्का, ऋषभ पंत 16 रनवर आऊट, क्विंटन डिकॉकने केलं स्टम्पिंग, भारताचा स्कोअर 34 ओव्हरमध्ये 182/5, विजयासाठी आणखी 115 रनची गरज

  20:42 (IST)

  भारताला चौथा धक्का, श्रेयस अय्यर 17 रनवर आऊट, लुंगी एनगिडीला मिळाली विकेट, भारताचा स्कोअर 33.5 ओव्हरमध्ये 181/4, विजयासाठी आणखी 116 रनची गरज

  20:40 (IST)

  शिखर धवन 79 रनवर तर विराट कोहली 51 रन करून आऊट, महाराजला धवनची आणि शम्सीला विराटची विकेट

  19:20 (IST)

  शिखर धवनचं अर्धशतक, भारताचा स्कोअर 14.4 ओव्हरमध्ये 78/1, भारताला विजयासाठी आणखी 217 रनची गरज

  18:58 (IST)

  भारताला पहिला धक्का, केएल राहुल 12 रनवर आऊट, एडन मार्करमला मिळाली विकेट, भारताचा स्कोअर 8.3 ओव्हरमध्ये 46/1, विजयासाठी आणखी 251 रनची गरज

  17:58 (IST)

  रस्सी व्हॅन डर डुसेनचं नाबाद शतक, कर्णधार टेम्बा बऊमानेही केलं शतक, 50 ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर 296/4, डुसेनने 96 बॉलमध्ये केले नाबाद 129 रन, भारताकडून बुमराहला 2 तर अश्विनला एक विकेट, व्यंकटेश अय्यरने केला एक रन आऊट

  पार्ल, 19 जानेवारी : टेस्ट सीरिजमधल्या पराभवाचा बदला वनडे सीरिजमध्ये (India vs South Africa 1st ODI) घेण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरत आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. तिन्ही फॉरमॅटची कॅप्टन्सी सोडल्यानंतर विराट कोहलीची (Virat Kohli) ही पहिलीच मॅच आहे. टी-20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup) विराटने टी-20 फॉरमॅटची कॅप्टन्सी सोडली, यानंतर त्याला वनडे टीमच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आलं. मग विराटने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टेस्ट सीरिज झाल्यानंतर टेस्ट टीमच्या कॅप्टन्सीचाही राजीनामा दिला. केएल राहुलच्या (KL Rahul) नेतृत्वात भारतीय टीम मैदानात उतरत आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी रोहित शर्माला (Rohit Sharma) भारताच्या वनडे टीमची कॅप्टन्सी देण्यात आली, पण दुखापतीमुळे रोहित शर्मा दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला नाही, त्यामुळे केएल राहुलला ही जबाबदारी देण्यात आली. याआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये विराट कोहली पाठीच्या दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता, त्यामुळे केएल राहुलनेच टीमचं नेतृत्व केलं होतं. या टेस्टमध्ये टीम इंडियाला पराभव पत्करावा लागला होता. व्यंकटेश अय्यरचं या सामन्यातून वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण झालं आहे, याआधी न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या टी-20 सीरिजमधून व्यंकटेश अय्यरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. दुसरीकडे अश्विनचंही 5 वर्षांनी वनडे टीममध्ये पुनरागमन केलं आहे. भारतीय टीम केएल राहुल, शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, व्यंकटेश अय्यर, शार्दुल ठाकूर, रवीचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल दक्षिण आफ्रिकेची टीम क्विंटन डिकॉक, जानेमन मलान, एडन मार्करम, रस्सी व्हॅन डर डुसेन, टेम्बा बऊमा, डेव्हिड मिलर, एन्डिले पेहक्लुक्वायो, मार्को जेनसन, केशव महाराज, तबरेज शम्सी, लुंगी एनगिडी