Home /News /sport /

IND vs SA : कॅप्टन्सीच्या पहिल्याच वनडेमध्ये राहुलचा वादग्रस्त निर्णय, मुंबईकराला वगळून संधी दिली, पण...

IND vs SA : कॅप्टन्सीच्या पहिल्याच वनडेमध्ये राहुलचा वादग्रस्त निर्णय, मुंबईकराला वगळून संधी दिली, पण...

Photo-BCCI/Twitter

Photo-BCCI/Twitter

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या वनडे सीरिजला (India vs South Africa 1st ODI) सुरूवात झाली आहे. कर्णधार म्हणून केएल राहुलची (KL Rahul) ही पहिलीच वनडे आहे, पण या सामन्यात केएल राहुलने मोठी चूक केली.

    पार्ल, 19 जानेवारी : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या वनडे सीरिजला (India vs South Africa 1st ODI) सुरूवात झाली आहे. पहिल्या वनडेमध्ये दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बऊमा (Temba Bavuma) याने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. यानंतर बऊमा आणि रस्सी व्हॅन डर डुसेन (Rassie van der Dussen) यांनी मोठ्या खेळी करत दक्षिण आफ्रिकेला सन्मानजनक स्कोअरपर्यंत पोहोचवलं. 40 ओव्हरपर्यंत दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर 215/3 एवढा झाला होता. कर्णधार म्हणून केएल राहुलची (KL Rahul) ही पहिलीच वनडे आहे, पण या सामन्यात केएल राहुलने मोठी चूक केली. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात व्यंकटेश अय्यरला (Venkatesh Iyer) टीममध्ये घेतलं. व्यंकटेश अय्यरला संधी मिळाल्यामुळे मुंबईकर सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) बाहेर बसावं लागलं. व्यंकटेश अय्यरची टीममध्ये ऑलराऊंडर म्हणून निवड झाली. पण पहिल्या वनडेमध्ये भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर आणि युझवेंद्र चहल अपयशी ठरत असतानाही राहुलने व्यंकटेश अय्यरकडे बॉल दिला नाही. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) दुखापतीमुळे टीम इंडियाच्या बाहेर आहे. निवड समिती आणि टीम प्रशासन व्यंकटेश अय्यरकडे हार्दिकला पर्याय म्हणून बघत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सीरिजवेळीही कर्णधार रोहित शर्माने आम्ही व्यंकटेशकडे ऑलराऊंडर म्हणूनच बघत आहोत, असं सांगितलं. पण तरीही व्यंकटेश अय्यरला बॉलिंग का देण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. व्यंकटेश अय्यरचं ही वनडे क्रिकेटमधली पदार्पणाची मॅच आहे. आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये व्यंकटेश अय्यरने कोलकाता नाईट रायडर्सकडून (KKR) धमाकेदार कामगिरी केली. व्यंकटेश अय्यरने ओपनिंगला येऊन केलेल्या आक्रमक खेळींमुळे केकेआर फायनलपर्यंत पोहोचली. यानंतर आयपीएल 2022 साठीही केकेआरने अय्यरला रिटेन केलं.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Kl rahul, Suryakumar yadav, Team india

    पुढील बातम्या